बदलत्या काळासोबत लहानपणीचे खेळ देखील ऑनलाइन झाले आहेत. पहिला आपण अनेक प्रकारचे खेळ खेळत होतो. यामध्ये एखाद्याच्या फोटो लपलेला शोधायचा असतो. या खेळाचे आता ऑनलाइन व्हर्जन आले आहे. यामध्ये देखील तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधण्याचा टास्क मिळतो. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामधील लपलेली गोष्टी तुम्हाला शोधायची आहे.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि पाऊस पडत आहे आणि लोक छत्री घेऊन जात आहेत आणि मुले पावसाची मजा घेत आहेत. लोकांच्या चेहऱ्यावर पावसाचा आनंद पाहायला मिळत आहे. हा फोटो एका पार्कमधला आहे. फुटपाथच्या दोन्ही बाजूला झाडे पाहायला मिळत आहेत.
यादरम्यान पावसामधून जीव देखील बाहेर पडत आहेत. एक मुलगी गोगलगायीसोबत पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये एक बेडूक देखील आहे. पण कोणाचीच नजर इतकी तीक्ष्ण नाही कि ते बेडूक शोधू शकतील. तुम्ही शोधू शकता का फोटोमधील बेडूक.
बेडूक तुमच्या समोरच आहे पण बहुतेक लोकांना तो सहजपणे दिसत नाही आहे. जर तुम्ही बेडूक पाहू शकत असाल तर तुम्ही खरच मास्टरमाइंड आहात. पण जर तुम्ही अजून देखील बेडूक पाहू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला बेडूक शोधायला मदत करतो.
फोटोमध्ये दोन्हीकडे झाडे आणि झुडपे आहेत. फोटोमध्ये वरच्या भागामध्ये रेलिंगजवळ एक बेडूक आपल्याकडे बघत आहे. बेडूक झुडपांमध्ये लपला आहे आणि हिरव्या रंगाचा आहे ज्यामुळे तो सहजपणे दिसत नाही आहे. अशा आहे कि तुम्हाला बेडूक दिसला असेल.