अनेकवेळा तुम्ही डोळ्यांचा धोखा खाल्ला असेल. ऑप्टिकल इल्यूजन याचे एक उदाहरण आहे. यामध्ये जे दिसते ते नसते आणि जे नसते ते दिसते ते आपले डोळे पाहू शकत नाहीत. यावेळी इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक रहस्य दडलेले आहे. ज्यामध्ये असलेले प्राणी कोणीच पाहू शकत नाही.

फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे कि काळ्या रंगामध्ये पांढऱ्या रेषा आहेत. ज्यामध्ये दोन वेगवेगळे प्राणी लपलेले आहेत. तथापि तुम्हाला ते इतक्या सहजसहजी दिसणार नाहीत. हे कोडेच असे बनवण्यात आले आहेत ज्यामुळे कोणाचीहि बुद्धी भ्रमित होईल.

फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसत आहेत. ज्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत. चॅलेंज हे आहे कि फोटोमधील ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला शोधून काढायचे आहे कि ते दोन प्राणी कोणते आहेत. हि एक मांजर देखील असू शकते किंवा एक उंदीर देखील असू शकते.

लोक आपली बुद्धी वापरून परेशान झाले आहेत. पण यामध्ये त्यांना कोणताही प्राणी मिळालेला नाही. हा फोटो ट्विटरवर टॉम हिक्स नावाच्या युजरने शेयर करताना लिहिले आहे कि या फोटोमध्ये तुम्ही एक मांजर किंवा उंदीर पाहू शकता. हे तुमच्या बुद्धीच्या फंक्शनिंगवर आधारित आहे.

रंजक बाब हि आहे कि या फोटोमध्ये तुम्ही जे काही पाहता तो याचा पार्ट नाही. तर तुमच्या बुद्धीने रचलेला भ्रम आहे. तुम्ही जसे फोटो झूम करून बघाल हे गायब होऊन जाईल. वास्तविक हे फक्त व्यक्तीच्या बुद्धीच्या फंक्शनिंगची टेस्ट आहे.

हे बुद्धीच्या डाव्या किंवा उजव्या भागावर आधारित असते कि तुम्ही कोणता प्राणी पाहता. हा फोटो पाहणाऱ्या काही लोकांना या फोटोमध्ये मांजर दिसली आहे तर काही लोकांना कोल्हा दिसला आहे. पण उंदीर खूपच कमी लोकांना दिसला आहे. त्यापेक्षाहि जास्त लोकांची हि तक्रार आहे कि त्यांना यामध्ये काहीच पाहायला मिळाले नाही. तर तुम्हाला फोटोमध्ये काय दिसले हे कमेंट करून नक्की सांगा.