मुलांना रागवल्याने होतात हे मोठे ६ नुकसान, हे जाणून तुम्ही पुन्हा आयुष्यात कधीच मुलावर हात उगारणार नाहीत !

By Viraltm Team

Published on:

माणूस हा चुकीचा पुतळा आहे. असे मानले जाते. पण त्यातूनच लहान मुले यांच्याकडून खूप चुका होत असतात, अशातच त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे, सांगण्याचा उद्देश असा नाही की पालक मुलांना प्रेमाने सांगत नाही, ते व्यवस्थित सांगतात पण सांगताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाहीत आणि त्यामुळे लहान मुलांवर हात उचलावा लागतो. पण आपण कधी विचार केला आहे का की लहान मुलांवर यावर मानसिक रूपाने काय फरक पडेल? लहान मुलांच्या मनात आईवडिलांविषयी काय चित्रण तयार होईल? याबद्दल आपण जाणून घेऊ.मुलांचे हिंसक होणे:- आजतागायत असे घडले आहे, जसे मुलांच्या निदर्शनास आले आहे तसेच ते त्यांच्या भविष्यात कार्य निभावतात. जर मुलांसोबत आपण जास्त मारहाण करत आहात तर तेही त्या सर्व गोष्टी शिकत असतो, आणि पुढे भविष्यात त्याला त्या गोष्टींची सवय लागते म्हणजेच तो हिंसक बनतो. मुलांचे पहिले गुरू आई वडील असतात, त्यांना जे दिसते तेच ते शिकतात, त्यामुळे माता आणि पिता यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून मुलांना समजूत घालावी. जर मुलांच्या दृष्टिकोनात आपण आपले चित्रण चांगले केले तर भविष्यात आपण त्यांच्यासाठी एक चांगली व्यक्ती ठरतो.मानसिक रूपाने दुःखी:- जास्त मार खाणारी मुले ही मानसिक स्थिती ने संतुलित राहत नाहीत. त्यांना कोणीही आपलं वाटत नाही, ते अंतकरणातून तुटलेले असतात. त्याला असे वाटत असते की सगळ्या वाईट गोष्टी त्याच्यात सामावलेल्या आहेत. तो स्वतः एक चांगला मनुष्य नाही, अशात मोठ्यापणी तो स्वतःची इज्जत स्वतः करू शकत नाही. त्यामुळे मुलांना मानसिक स्थिती ने मजबूत ठेवावे. त्याच्या मनात किंवा त्याच्या समोर उत्तम विचारसरणी मांडवी. कोणतीही गोष्ट त्याला होणार नाही याचा भास होऊ देऊ नये.आत्मविश्वासाची कमी :- कोणतेही काम करण्यापूर्वी आत्मविश्वासाची गरज असते. जर एखाद्याने ठरवले की हे काम मला होणारच नाही तर ते काम साध्य होत असेल तरीही त्याच्या आत्मविश्वासाच्या कमीने ते अर्धवट राहील, आणि एखादे काम हे कठोर परिश्रमाचे असेल पण मनात निर्धार करून असलेल्या व्यक्तीला ते काम सहजरित्या पार पडते. कारण, त्यात आत्मविश्वासाची कमी नसते. जास्त ताणतणावामुळे मुलांच्या आत्मविश्वासात कमी येते आणि या तणावामुळे त्याच्या मनावर वेगळीच छाप उमटते. कोणतेही काम करताना ते भीतीदायक स्वभावाने करतात. त्यामुळे कधीही मुलांना चांगल्या गोष्टींचा सल्ला द्यावा.विद्रोही होणे:- खूप वेळा असे पाहिले जाते की मुले मार खाऊन खाऊन थकतात. त्यांची सहनशीलता संपते, ज्यामुळे की मुलांचे वागणे हे विद्रोही भावनेचे होते त्यामुळे ते जाणून-बुजून चुका करतात. त्या मुलांना चांगले काम होत असेल तरीही त्या विद्रोही स्वभावामुळे ते वाईट कामे करतात. त्यांना त्यातच मजा वाटते. त्यामुळे मुलांवर कधीही जास्त बंधने घालू नयेत, आणि मर्यादित नियम किंवा अटी घालाव्या.जास्त राग येणे :- ज्या मुलांना जास्त मार्क पडत असतो, ते भविष्यात पुढे चालून जास्त राग करत असतात. कारण, लहानपणी त्यांच्यावर झालेल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून ताणतणावामुळे मोठ्यापणी ते छोट्या छोट्या गोष्टींवरही राग करू लागतात. जर मुलांशी साधारण व्यवहार केला तर त्यांचे भविष्य वेगळेच दिसू शकते. मुलांचा स्वभाव हा कधीही मोठा राग येत नसतो त्यांना तसे निदर्शनास आल्याने ते तसे बनतात.
आई वडिलांचा राग:- जेव्हा पालक आपल्या मुलाला जास्तच त्या नाव देतात तेव्हा मुलांच्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण होत असतो. त्यांना असे वाटते की मम्मी पप्पा माझ्यावर प्रेम करत नाही, म्हणून मला सारखं ऐकवत असतात. ही विचारसरणी कायम त्याच्या डोक्यात राहते. मोठ्यापणी ही ते तोच विचार करून आईवडिलांची जास्त प्रेम करत नाही आणि त्यांचे काळजी ही घेत नाहीत. त्यामुळे मुलांना कधीही मर्यादेपेक्षा जास्त त्रास होऊ नये अशी वागणूक ठेवावी. त्या मुलाच्या मनात आपले चित्रं हे स्वच्छ प्रवृत्तीचे असावे अशी त्याला वागणूक द्यावी.

अशाच काही कारणांमुळे आपल्याला मुलांना तणावापासून वाचवायला पाहिजे, खास करून लहान सहान गोष्टींवर त्यांना बोलायला नाही पाहिजे. प्रेमाने सांगणे, समजूत घालने हा एक उत्कृष्ट पर्याय असतो. त्यामुळे कधीही आपल्या मुलाला आपण ख्यालीखुशालीत ठेवावे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment