टीव्ही इंडस्ट्री भारतामध्ये खूपच जुनी आहे आणि सिरियल्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांची फॅन फॉलोइंगही खूप मोठी आहे. नवीन कलाकार तर इंडस्ट्रीमध्ये येत राहतातच पण असे काही कलाकार आहेत जे अनेक वर्षे इथे काम करत आहेत.
नुकतेच टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर अलंकार जिने अनेक हिंदी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे, तिने इंडस्ट्री सोडून सन्यास घेतला आहे आणि आता ती हिमालयाकडे जात आहे. २७ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर नुपूरने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे.
नुपूर अलंकारने सन्यास घेत असल्याची घोषणा स्वतःच केली आहे. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले कि तिने फेब्रुवारीमध्ये सन्यास घेतला आहे आणि आता ती तीर्थयात्रा आणि गरीबांच्या मदतीमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री नुपूर अलंकार CINTAA ची सदस्य देखील राहिली आहे.
नुपूर अलंकारने आता इंडस्ट्री सोडली आहे आणि ती एक संन्यासी बनली आहे. तिचे म्हणणे आहे कि तिने आता स्वतःला अध्यात्ममध्ये झोकून दिले आहे आणि आता ती आयुष्यभर त्याचे पालन करणार आहे. तिने म्हंटले कि तिने स्वतःला अध्यात्मसाठी समर्पित केले आहे आणि मुंबईमधील आपला फ्लॅट भाड्याने देऊन ती हिमालयाकडे वाटचाल करत आहे. नुपूरचे पती आणि तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या निर्णयाला समर्थन केले आहे आणि आता ती त्यांच्यापासून वेगळी झाली आहे.
नुपूर अलंकार ४९ वर्षाची आहे आणि गेल्या २७ वर्षांपासून ती शोबीजमध्ये काम करत होती. नुपूरने १५० पेक्षा जास्त टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटियां आणि दीया और बाती हम सारखे सुपरहिट शो आहेत. नुपूर अलंकार राजा जी, सांवरिया आणि सोनाली केबल सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.