ऐंशीच्या दशकामध्ये टेलिव्हिजन जगतावर रामायण मालिकेने अक्षरशः राज्य केले होते. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिका त्यावेळी खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. रामायण मालिकेमध्ये राम आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देव मानले जात होते.
मालिकेमध्ये रामाची भूमिका अभिनेता अरुण गोविल यांनी केली होती तर सीतेची भूमिका दीपिका चिखलीया या अभिनेत्रीने साकारली होती. रामायण हि मालिका आजपर्यंत जवळजवळ ६५० मिलियन लोकांनी पहिली आहे. आतापर्यंतच्या मालिकांमध्ये हा रेकॉर्ड कोणीही तोडू शकलेले नाही.
सीतेची भूमिका केलेली अभिनेत्री दीपिका चिखलीया आज देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. पण सध्या दीपिका तिच्या एका पोस्टमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. तिच्या या फोटोमुळे ती नेटकऱ्यांच्या चांगलीच निशाण्यावर आली आहे. सोशल मिडियावर सध्या ती खूपच ट्रोल होत आहे.
दीपिकाने रविवार तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेयर केले. यामध्ये ती स्कूल युनिफोर्ममध्ये पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणीदेखील मॉर्डन लुकमध्ये पाहायला मिळत आहेत.
दीपिकाने रामायण मालिकेमध्ये साकारलेल्या सीतेच्या भूमिकेला तोड नाही. तिच्या या भूमिकेमुळे तिला अशा अवतारामध्ये पाहणे नेटकऱ्यांना पसंत नाही. दीपिकाने शेयर केलेल्या या फोटोमध्ये तिने व्हाइट शर्ट , ब्लू शॉर्ट स्कर्ट घातला असून ती खूप बोल्ड दिसत आहे.
तर दीपिकाने हातामध्ये ड्रिं’कचा ग्लास देखील घेतला आहे. रविवारी आम्ही शाळेला निघालोय असे म्हणत तिने हा फोटो शेयर केला आहे. तिघींचा हा फोटो पाहून नेटकरी म्हणत आहेत त्या न’शे’मध्ये आहेत तर काहींनी सीतेचा हा कोणता अवतार आहे असे म्हंटले आहे. तर काहींनी म्हंटले आहे कि असे कपडे घालायला नको होते आम्ही तुला देवीचा दर्जा दिला आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला चांगलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला ज्यामुळे तिने हि पोस्ट डिलीट करून टाकली. दीपिकाला जेव्हा या पोस्ट बद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली कि मला माहित नव्हते कि मला ट्रोल केले जाईल नाहीतर मी असा फोटो शेयर केला नसता.
मी कधीच माझ्या चाहत्यांना दुखावले नाही. मला खूपच वाईट वाटत आहे. दीपिका पुढे म्हणाली कि लोक खुश नाहीत. जगामध्ये तसे तर खूप काही होत आहे त्यात आणखी एक मुद्दा कशाला वाढवावा. दीपिका हे देखल म्हणाली कि असा फोटो शेयर करणे माझी चूकच आहे. दीपिका हातामधील ड्रिं’कवर उत्तर देताना म्हणाली कि माझ्या हातामध्ये अ’ल्को’हो’ल नव्हते कारण मी दा’रू पीत नाही.