जेठालाल दिलीप जोशी यांचं दयाबेन दिशा वकानीबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले; ४ वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दया बेन गेल्या ५ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करत नसली तरी तिची चर्चा काही कमी झालेली नाही. शोमध्ये दयाबेनची भूमिका दर्शकांच्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे. सध्या दिशा या शोमध्ये परत येणार नाही आता हे कन्फर्म झाले आहे.

पण दिशा वकानीच्या पुनरागमनाबद्दल जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आता सर्वत्र हीच चर्चा पाहायला मिळत आहे. खुलासा करताना दिलीप जोशी म्हणाले कि मी आणि अभिनेत्री गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात नाही.

एका मुलाखीती दरम्यान जोशी म्हणाले कि खरे सांगायचे तर दिशा खूपच खास व्यक्ती आहे पण तिने जेव्हा शो सोडला तेव्हापासून मी तिच्या संपर्कामध्ये नाही. तिच्याबद्दल जे काही ऐकायला मिळते ते सेटवर ऐकायला मिळते. तिला कुटुंबाची जबाबदारी महत्वाची वाटते हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तारक मेहता शोमध्ये तिने तब्बल १० वर्षे काम केले यासाठी तिचा नेहमी आदर राहील. आता ती कुटुंबाला जास्त महत्व देते यामुळे तिला त्रास दिला जाऊ नये. तिच्यामध्ये एक कलाकार अजून देखल जिवंत आहे तिला जेव्हा इच्छा होईल तेव्हाच ती परत येईल.

यादरम्यान दिलीप जोशी हे देखील म्हणाले कि मी दिशाला खूप मिस करतो, आम्ही जवळ जवळ १० वर्षे एकत्र काम केले. आमची ट्युनिंग खूपच चांगली जमली होती. गेल्या १० वर्षामध्ये आम्ही अनेक सुंदर सीन एकत्र शूट केले. कॉमेडीच्या बाबतीत दिशाचा कोणीही हात धरू शकत नाही.

दिशा एक उत्कृष्ट कलाकार आहे. एक अभिनेता म्हणून नाही तर एक दर्शक म्हणून तिला ऑनस्क्रीन पाहायला खूपच भारी वाटते. त्यामुळे मी काही जुन्या क्लिप्स देखील बघत बसतो ज्यामुळे मला खूपच मज्जा येते. एक व्यक्ती म्हणून मला तिची खूप आठवण येते.

Leave a Comment