टीव्ही इंडस्ट्री हा’दर’ली ! सिद्धार्थ शुक्ला नंतर आता ‘या’ प्रसिद्ध सिरीयलमधील दिग्गज अभिनेत्याचे नि’धन…

By Viraltm Team

Published on:

भाभी जी घर पर हैं या टीव्ही शोमधील सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक असलेल्या मलखानची भूमिका करणारे अभिनेते दिपेश भान यांचे निधन झाले आहे. माहिती नुसार शनिवारी दिपेश क्रिकेट खेळताना पडले होते ज्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

डॉक्टरांनी त्यांना मृ त घोषित केले. ४१ व्या वर्षी कमी वयामध्येच दिपेश यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दिपेशच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांसोबत सेलेब्रिटीजना देखील मोठा धक्का बसला आहे. लोक सोशल मिडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

२०१९ मध्ये दिपेशने दिल्लीमध्ये लग्न केले होते. अभिनेत्याला एक मुलगा देखील आहे. भाभीजी घर पर हैं मध्ये टीकाची भूमिका करणारे अभिनेते वैभव माथुरने देखील दिपेश यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले कि, आता ते राहिलेले नाहीत. यावर मी काही बोलू इच्छित नाही कारण बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही.

दिपेशच्या निधनानंतर कविता कौशिकने दुख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करताना लिहिले आहे कि ४१ व्या वर्षीच दिपेश भानच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. ते एफआयआरचा एक महत्त्वाचा भाग होते. ते खूपच फिट होते. त्यांनी कधी धुम्रपान केले नाही आणि दा रू देखील पिली नाही. त्यांनी आरोग्याला नुकसान पोहोचवणारे काम कधीच केले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाचा मुलगा आणि आईवडील असा परिवार आहे.

दिपेश भान भाभीजी घर पर हैं, कॉमेडी का किंग कौन, कॉमेडी क्लब, भूतवाला, एफआईआर सारख्या अनेक कॉमेडी शोजमध्ये काम केले आहे. त्यांची कॉमेडी चाहत्यांना खूपच आवडत होती. २००७ मध्ये ते फालतू उटपटांग चटपटी कहानी चित्रपटामध्ये देखिली दिसले होते.

Leave a Comment