भारतीय, पाकिस्तानी, इंग्लंड प्रत्येक क्रिकेट संघात हँडसम क्रिकेटर आहेत ज्यांच्या पत्नी देखील खूपच हॉट आहेत. सुंदर पत्नी तर प्रत्येकाला हवी असते, पण या क्रिकेटर्सच्या पत्नीतर काही जास्तच सुंदर आहेत. यांच्या पत्नी सुंदर असण्यासोबत चांगल्या लाईफ पार्टनरदेखील आहेत. ज्याबद्दल हे क्रिकेटर्स स्वतःच लिहितात. या खेळाडूंच्या पत्नींना पाहिल्यानंतर तुम्ही देखील हेच म्हणाल कि कदाचित असे नशीब आमचे देखील असायचे हवे होते. असो तुमची देखील अपेक्षा पूर्ण व्हावी. तथापि यामध्ये काही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत तर काही इतर प्रोफेशनशी.
साक्षी सिंह: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत आणि लोकप्रियतेच्या बाबत मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते. धोनीने २०१० मध्ये साक्षीसोबत लग्न केले होते. २०१५ मध्ये साक्षीने मुलगी जीवाला जन्म दिला होता. तसे तर धोनीची पत्नी साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असला तरी धोनीशी लग्न केल्यानंतर तिने गृहिणीची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला.
प्रियांका चौधरी: क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरीने लग्नाच्या अगोदर आपले बरेच आयुष्य नेदरलँडमध्ये घालवले. रैना आणि प्रियांकाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये प्रियांकाने मुलीला जन्म दिला. रैनाची पत्नी प्रियांकाने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ती एका एनजीओमध्ये काम करत आहे. सौंदर्याच्या बाबतीत प्रियांका एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
अंजली तेंडुलकर: सचिन तेंडूलकरची पत्नी अंजली तेंडुलकरने मेडिकलचे शिक्षण घेतले होते आणि लग्नाच्या अगोदर ती पीडियाट्रिक होती. लग्नानंतर तिने सचिनच्या करियरमध्ये लक्ष देऊन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. असे नाही कि अंजली पूर्णपणे गृहिणी आहे तर सचिनचे म्हणणे आहे कि कुटुंबातील आणि रोजचे काम आणि स्टाफला सांभाळण्याचे काम ती करते. याशिवाय अंजली मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासंबंधी अनेक सामजिक कार्यांमध्ये देखील सहभागी होते.
जेसिम लोरा: क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोरा तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जेसिम लोराला इंस्टाग्रामवर ३ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोरा ही व्यवसायाने मॉडेल आहे. आंद्रे रसेल आणि जेसिम लोरा यांची २०१४ मध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले. लग्नाच्या ४ वर्षांनंतर जेसिम लोराने एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव आलिया रसेल आहे.
मधिमलार राममूर्ती: कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधित विकेट घेणारा श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन याला जगतील टॉप फलंदाज घाबरतात. मुरलीधरनने चैन्नईची मुलगी मधिमलारसोबत २००५ मध्ये लग्न केले होते. मधिमलार डॉ एस राममूर्ति आणि डॉ नित्याची मुलगी आहे, जे मलार हॉस्पिटल्सचे मालक आहेत. मुरलीधरन आणि मधिमलार रामामूर्ति यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुरलीधरनची पत्नी मधिमलार बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. लग्नाच्या वेळी मधिमलरला क्रिकेटमध्ये रस नव्हता.
निर्वाणी: निरवानी आणि शिमरोन यांची मैत्री सोशल मिडियावर झाली होती. शिमरोनने पहिल्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर सतत मेसेज करत राहिला. अनेक दिवसांनी निर्वाणीने त्याच्यामध्ये रस दाखवला आणि दोघे एकमेकांना डेट करू लागले. २०१९ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी, हेटमायरने निर्वाणीला लग्नासाठी प्रपोज केले होते. निर्वाणीने सोशल मिडियावर अंगठीचा एक फोटो शेयर करत हि आनंदाची बातमी शेयर केली होती. निर्वाणीही आयपीएलदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली होती. हेटमायरने अनेकवेळा सांगितले आहे कि त्याची पत्नी खूपच चेष्टेखोर आहे म्हणून त्याला ती खूप आवडते.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.