सुर्याकुमार यादवप्रमाणेच गावतील हि मुलगी मारते चौकार-षटकार, सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

नुकतेच भारतीय महिला क्रिकेट टीमने पाकिस्तानला हरवून कीर्तिमान रचला आहे. त्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यादरम्यान बाड़मेरच्या शेरपुरा कानासरची एक १४ वर्षीय मूमल मेहरच्या गावामध्ये क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ कोणाच्यातरी हातामध्ये लागला. त्याने हा व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये मूमल एकामागून एक शॉट मारताना दिसत आहे. तिचे उत्कृष्ट शॉट पाहून प्रत्येकजण हैराण आहे. मूमल मेहर शेरपुर कानासरच्या मठार खान या शेतकऱ्याची मुलगी आहे. तिच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. खेल्यासाठी तिच्याजवळ बूट देखील नाहीत. तिला जिथे बॅट तिथेच ती शानदार फटकेबाजी करायला सुरुवात करते.

मूमल मेहरच्या वडिलांची इतकी कमाई नाही कि ते आपल्या मुलीला क्रिकेटचे ट्रेनिंग देऊ शकतील. मूमल मेहरला सहा बहिणी आहेत. सध्या शाळेचे शिक्षण रोशन खान मूमलला ट्रेनिंग देत आहेत. रोज तीन ते चार तास ते तिच्याकडून सराव करून घेतात. मूमल खेळासोबत ती आपल्या आईच्या कामामध्ये हातभार देखील लावते. घरातील शेळ्या देखील तिला चाराव्या लागतात. मुमलला सहा बहिणी आणि दोन भाऊ आहेत. मुमल घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाते. क्रिकेटचा सराव करते आणि मग घरी येते.मूमलचे म्हणणे आहे कि ती इंडियन क्रिकेटर स्टार सूर्यकुमारचा खेळ पाहते. त्याला पाहूनच ती असे शॉट्स मारण्याचा प्रयत्न करते. दररोज तीन-चार तास ती खेळते. रोशन भाई तिचा सराव करून घेतात. नुकतेच ग्रामपंचायत ते जिल्हा स्तरापर्यंत ग्रामीण ऑलिम्पिक खेळले गेले. मूमलची टीम चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये हरली. पण उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने आपली प्रतिभा दाखव नाबाद २५ धावा बनवल्या आणि सात विकेट देखील घेतल्या.

मूमलची साथ तिची लहान बहिण अनिशा देते. तिला देखील चांगले क्रिकेट खेळता येते. अनिशाचे चॅलेंजर क्रिकेट ट्रॉफी अंडर-१९ राजस्थान संघात निवड झाल्याने मूमलची क्रिकेटमधील रुची वाढली. मूमलचे कोच रोशन खान सांगतत कि मूमलच्या खेळाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अशा आहे कि सरकार तिला मदत करेल.

अनिशाची गेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियममध्ये झालेल्या ट्रायलमध्ेन गोलंदाज म्हणून सिलेक्शन झाले. अनिशा जिल्ह्यातील पहिली मुलगी आहे जी स्टेट टीमसाठी क्रिकेट खेळली आहे. आता मूमल तिच्यामुळे प्रेरित आहे. तिला देखील क्रिकेटमध्ये पुढे जायचे आहे. मूमलचा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रदेश अध्यक्ष सतीश पूनिया, केन्द्रीय कृषि राज्य मंत्री कैलाश चौधरी आणि पाली खासदार पीपी चौधरी सहित अनेक लोक तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Leave a Comment