रियालिटी शो असो किंवा इतर कोणत्याही स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून डांसमध्ये लोकांची प्रचंड आवड निर्माण झाली आहे. ज्याला डांस देखील येत नाही असा व्यक्ती कानावर गाण्याचा आवाज पडताच त्याचे पाय आपोआपच थिरकू लागतात. असाच एक चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच राडा करत आहे.
मुलीमधील आत्मविश्वास पाहून आजून बाजूचे लोक देखील तिचा डांस पाहण्यात इतके दंग होतात कि त्यांची ट्रेन मिस होते. चिमुकलीने इतका भन्नाट डांस केला आहे कि अनेक लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या हाल कैसा है जनाब का या गाण्यावर ती ठेका धरताना पाहायला मिळत.
स्टेशनवरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची नजर ती आपल्याकडे वेधून घेण्यास भाग पाडत आहे. अनेक लोक तिच्या या डांसबद्दल तिचे कौतुक देखल करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगला व्हायरल झाला आहे. ज्यावर लोक देखील भरभरून प्रतिसाद देत आहेत.
काय भन्नाट डांस करते हि चिमुरडी… ही तर छोटा पॅकेट बडा धमाका अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर केल्या आहेत. तिचा डांस पाहत उभे राहणाऱ्या अनेक लोकांची तर ट्रेन देखील मिस झाली. ट्रेन मिस होऊन देखील लोकांच्या चेहऱ्यावर तिचा परफॉर्मन्स पाहिल्याचा आनंद दिसत आहे.
पहा व्हिडीओ:-
View this post on Instagram