तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार चला हवा येवू द्या’चा ‘हा’ अभिनेता, आता ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार तिसरं लग्न

By Viraltm Team

Published on:

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीनघाई जोरात सुरु आहे. अशामध्ये आता आणखी एका अभिनेत्याच्या हळदीचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येवू द्या या शोमधील कलाकाराचा हा व्हिडीओ असून त्यांच्या हळदीची धम्माल मस्ती व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

चला हवा येवू द्या हा शो झी मराठीवरील सर्वात पॉपुलर शोपैकी एक आहे. निलेश साबळेच्या या शोने अल्पावधीमध्ये खूपच चांगली लोकप्रियता मिळवली आहे. दर्शकांमध्ये आवर्जून पाहिल्या जाणाऱ्या शो पैकी हा एक शो आहे. या शोमध्ये कलाकार भारत गणेशपुरे यांच्या हळदीचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.

अभिनेता भारत गणेशपुरेचे लग्न लागले आहे. बँड बाजा वरात आणि सेलेब्रिटीचं लग्न जोरात या भागामध्ये भारत गणेशपुरे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा लग्नसोहळा दाखवण्यात आला आहे. यादरम्यान लग्नाचे सर्व विधी पुन्हा पार पाडण्यात आले होते.

अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे असे आहे. यादरम्यान सेटवर सर्व कलाकारांनी या लग्नाचा आनंद घेतला. अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत. त्यांना १२ वर्षाचा मुलगा देखील आहे.

या कार्यक्रमामध्ये भारत गणेशपुरे पत्नी अर्चनासोबत पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना पाहायला मिळणार आहे. अभिनेता भारत चला हवा येवू द्या मधून दर्शकांना खळखळून हासवल्या नंतर आता इंडिया लाफ्टर चॅलेंज या हिंदी शोमधून संपूर्ण भारतामधील दर्शकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. चला हवा येवू द्याचा हा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Comment