जगभरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे महिला आणि मुलींच्या प्रती समाजाची विचारसरणी घृणास्पद आहे. फक्त भारतामध्येच नाही तर देशविदेशांमध्ये देखील अनेक प्रथा आहेत ज्या खूपच हैराण करणाऱ्या आहेत. यादरम्यान चीनमधून एक असे प्रकरण समोर आले आहे जिथे एका महिलेलाला चक्क पाच तास आपली वर्जिनिटी टेस्ट द्यावी लागली आहे.
वास्तविक हे प्रकरण पूर्व चीनच्या जियांग्शी प्रांतामधील आहे. माहितीनुसार येथील रहिवाशी एक मुलगी लग्नानंतर आपल्या सासरी पोहोचली जिथे तिच्या उघड्या पायांना जमिनीशी स्पर्श करू दिला गेला नाही. असे सांगितले जाते कि याआधी आणखी एक प्रथा करण्यात येणार आहे. हि प्रथा जरा विचीत्रच आहे. या प्रथेनंतरच नववधूचा पाय सासरच्या जमिनीवर पडेल.
असे म्हंटले गेले कि असे केल्यानंतर नववधूची वर्जिनिटी टेस्ट होईल आणि त्यानंतर सर्व काम चांगल्या कामांमध्ये बदलतील. ती स्वतः सासरच्यांसाठी सौभाग्यशाली सिद्ध होईल आणि त्यांचा विकास होईल. या प्रथेमध्ये नववधूला पाच तास एकाच टोपल्यामध्ये उघड्या पायांनी बसावे लागेल. ज्यामध्ये तिचा पाय जमिनीला लागणार नाही. न थांबता, न काही करता हे करायचे आहे. नववधूला देखील सांगितले गेले कि असे करणे खूप गरजेचे आहे.
माहितीनुसार नववधूचे काही फोटो समोर आले ज्यामध्ये दाखवले गेले कि तिला असे करण्यास किती त्रास होत होता. हे फोटो पाहिल्यानंतर लोक भडकले आहेत आणि स्वतः चीनचे लोक देखील याला वाईट म्हणत आहेत. चीनच्या अनेक भागांमध्ये आज देखील अशी प्रकरणे समोर आली आहेत जिथे नववधूला अनेक विचित्र प्रथांमधून जावे लागते.