लग्नाचा हंगाम असो वा नसो, पण लग्नाच्या कार्यक्रमाच्या संबंधीत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात, ज्यामधील काही व्हिडीओ मनाला लागत आहेत, तर काही व्हिडीओ भावनिक करताना दिसत आहेत. अलीकडे असाच एक व्हिडीओ समोर येताना दिसत आहे, जे लग्नाच्या विधीशी संबंधित आहे, ज्याला पाहून तुम्ही देखील भावूक होऊ शकता. व्हिडीओमध्ये एक सुंदर नववधू निरोपाच्या वेळी रडताना दिसत आहे. खरं तर, तिला फक्त तिचे कुटुंब आणि घर सोडण्याचे दुखः आहे, पण तिच्या प्रेमळ कुत्र्यापासून देखील वेगळे होण्याचे दुखः आहे.
फक्त २४ सेकंदाच्या या भावनिक करणाऱ्या व्हिडीओ मध्ये नववधू निरोपाच्या वेळी तिच्या पाळीव कुत्र्याने जे केले, त्याला पाहून प्रत्येकजण भावूक होईल. व्हिडीओ मध्ये पाहू शकता कि, नववधूचा निरोपसोहळा होत आहे, अशातच नववधू चा निरोप घेताना तिचा पाळीव कुत्रा तिच्या पासून दूर जाण्यास तयार नाही.
व्हिडीओ ला पाहून असे वाटत आहे कि, कुत्रा…नववधू ला घरातून जाण्यापासून थांबवत आहे. व्हिडीओ मध्ये दोघांच्यातील प्रेम पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला खूप पाहिले जात आहे आणि पसंत देखील केले जात आहे. हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठला आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
सोशल मिडिया प्लेट्फोर्म इंस्टाग्राम वर हा भावनिक करणारा व्हिडीओ एका वेगळ्या अकौंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३३ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिलेले युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजर ने लिहिले आहे कि, ‘प्राणी देखील हे सगळे जाणतात’, तर दुसऱ्या एका युजर ने लिहिले आहे कि, ‘ती कुत्र्याला तिच्या सोबत घेऊन जावू शकते’, तिसऱ्या युजर ने लिहिले आहे कि, ‘माहिती नाही पण हा व्हिडीओ पहिल्या नंतर मला रडू येत आहे’, काही दिवसांपूर्वी देखील असाच एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक नवरा त्याच्या कुत्र्याला गाडीवर बसवून लग्नाच्या मांडावापर्यंत आला होता.
Watch! Adorable Dog Refuses To Let Go Off Bride During Vidai#TNShorts #ViralVideo pic.twitter.com/kdolsakmgE
— TIMES NOW (@TimesNow) February 3, 2023