प्रसिद्ध वेबसिरीज आश्रममध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. सध्या आश्रम ४ वेबसिरीजची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. इतर सिझनप्रमाणे आश्रम वेबसिरीजचा तिसरा सिझनदेखील सुपरहिट झाला. दर्शकांनी या सिझनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नुकतेच अभिनेता बॉबी देओलने ‘आश्रम ४’ वेबसिरीजचा टीज नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. यावरून असे समजत आहे कि ‘आश्रम ४’ लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. दर्शक देखील आतुरतेने ‘आश्रम ४’ची वाट पाहत आहेत.
पण तुम्हाला हे माहिती आहे का कि अभिनेता बॉबी देओलने ‘आश्रम ४’ मधील आपल्या भूमिकेसाठी प्रकाश झा समोर एक मोठी अट ठेवली होती. स्वतः प्रकाश झा यांनी एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला आहे.
मुलाखतीदरम्यान बोलताना प्रकाश झा म्हणाले कि जेव्हा बॉबी देओलला ‘आश्रम ४’ बद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला ‘बाबा जाने मन की बात’. यानंतर तो पुढे म्हणाला कि मला सिझन बनवायचे आहेत आणि बनवत राहायचे आहेत.
यानंतर प्रकाश झा पुढे म्हणाले कि ‘आश्रम ४’ साठी आधी तिसऱ्या सिझनच्या भागांमध्ये किती वाढ होणार आहे ते पहायचे आहे. त्यानंतर पुढच्या सिझनचे नियोजन करता येणार आहे. सध्या ‘आश्रम ३’ देखील सुपरहिट ठरला आहे.
‘आश्रम ३’ ने एक मोठा विक्रम देखील केला आहे. हि वेबसिरीज आतापर्यंत ओटीटीवर सर्वात जास्त बघितली जाणारी वेबसिरीज बनली आहे. नुकतेच ‘आश्रम ४’ चा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. ‘आश्रम ४’ मध्ये बॉबी देओल सोबत चंदन रोय, अदिती आणि त्रिधा चौधरी मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता ‘आश्रम ४’ कोणकोणते रेकोर्ड मोडीत काढतो हे आता वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.