करोडोच्या रोल्स रॉयसला बनवले टॅक्सी, एका दिवसाचे भाडे ऐकून थक्क व्हाल…

By Viraltm Team

Published on:

रस्त्यावरून कुठलीही आलिशान गाडी जात असेल तर आपली जाणर क्षणभर त्या गाडीवर थांबते. अशामध्ये सोन्याची गाडी दिसली तर…? कुणालाही धक्का बसेल.. सध्या देशातील आयटी हब म्हणजेच बंगळुरूच्या रस्त्यांवर लक्झरी टॅक्सी दिसू लागल्या आहेत, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, रस्त्यावर धावणाऱ्या टॅक्सींना लक्झरी असे का म्हणत आहे? चला तर मग यामागील कारण जाणून घेऊया आणि या आलिशान कारमध्ये एका दिवसाच्या प्रवासासाठी तुम्हाला किती खर्च येईल हे देखील जाणून घेऊया.

केरळमधील एका व्यावसायिकाला त्याच्या कारकडे पाहणाऱ्या लोकांचा इतका राग आला की त्याने एक धक्कादायक प्रकार केला. या व्यावसायिकाने आपल्या रोल्स रॉयस फॅंटम या आलिशान कारचे चक्क टॅक्सीमध्ये रूपांतर केले. आता ही टॅक्सी पर्यटकांना घेऊन जाऊ लागली आहे. टॅक्सीचे एका दिवसाचे भाडे २५ हजार रुपये इतके आहे. हे भाडे इतर टॅक्सींच्या तुलनेत जास्त वाटत असले तरी, तुम्हाला रोल्स रॉयस फँटम कारमध्ये राईड आणि तीही दिवसभरासाठी मिळते.डॉ बॉबी चेम्मनूर यांनी त्यांच्या रोल्स रॉयसचे टॅक्सीमध्ये रूपांतर केले आहे. बॉबीची कंपनी चेम्मनूर ग्रुपचे भारतासह इतर अनेक देशांमध्ये आऊटलेट्स आहेत आणि ते केरळमधील प्रमुख व्यावसायिकांपैकी एक आहेत. बॉबीने सांगितले की, लोक त्याच्या कारकडे टक लावून पाहायचे, जे त्याला अजिबात आवडत नव्हते. कारमधून प्रवास करणे त्याला आवडत नव्हते. या कारणास्तव, त्याने आपल्या आलिशान कारचे टॅक्सीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. कारचे टॅक्सीमध्ये रूपांतर करण्यापूर्वी बॉबीने फॅंटमचा काळा रंग सोनेरी पिवळ्या रंगामध्ये बदलला.

कारला ग्लॉसी गोल्डन कलर देण्यात आला आहे जो कारला गोल्डन फील देतो. लोकांचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून रोल्स रॉयसच्या वर टॅक्सीचे लाईट देखील लावले आहेत. बॉबीने या कारचे नाव द गोल्डन चॅरियट ठेवले आहे. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर देखील VIP आहे, कारचा क्रमांक ०००१ आहे. Rolls Royce Phantom ची किंमत ऐकून प्रत्येकाला धक्का बसतो. बॉबीने बिनदिक्कतपणे टॅक्सीमध्ये रूपांतरित केलेल्या कारची किंमत जवळ जवळ ८.९९ कोटी ते १०.५० कोटी रुपये आहे. या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स आहेत. या कारचा टॉप स्पीड २४०kmph आहे.

Leave a Comment