फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री सध्या इंडस्ट्रीला राम राम ठोकत आहेत. ज्यामध्ये सना खान आणि जायरा वसीम सारख्या लोकप्रिय अभिनेत्री सामील आहेत. या अभिनेत्रींनी इंडस्ट्रीपासून दूर जात इस्लामचा मार्ग निवडला आहे आणि आता भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सहर अफशाने देखील असा निर्णय घेतला आहे.
सहर अफशाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना तिच्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेयर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सहर अफशाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या मनातील गोष्ट चाहत्यांसोबत शेयर करण्याचा निर्णय घेतला आहे. हि नोट तिने हिंदी, इंग्लिश आणि उर्दूमध्ये शेयर केली आहे. तिने लिहिले आहे कि मी सर्वाना सांगू इच्छिते कि मी हा निर्णय घेतला आहे कि मी फिल्म इंडस्ट्री सोडणार आहे आणि आता माझ्या इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नाही.
माझा आता अल्लाहच्या अल्हम यांच्यानुसार जगण्याचा माझा मानस आहे. मी मी अल्लाहकडून पश्चात्ताप करतो. मी अल्लाहकडे क्षमा मागत आहे. मला खूप प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली तरी मी हा मार्ग सोडणार नाही. पुढचे आयुष्य इंशाल्लाह, अल्लाहच्या आज्ञेनुसार घालवण्याचा मानस आहे. मला तुमच्या सर्वांची दुवा हवी आहे. अशा करते कि मला भूतकाळातील आयुष्यामुळे नाही तर येणाऱ्या आयुष्यामुळे ओळखले जावे.
सहर अफशाची हि पोस्त सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे आणि या वर सहरच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. यादरम्यान सहर अफशाच्या या निर्णयावर सना खानने आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले आहे कि माशाअल्लाह माझी बहिण मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. अल्लाह तुम्हाला प्रत्येक चरणावर आशीर्वाद देईल.
View this post on Instagram