आपल्या देशात नृत्याची एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येक देश आणि प्रदेशाचे स्वतःचे पारंपारिक नृत्य असते, परंतु विवाहसोहळ्यांमध्ये नृत्याची कोणतीही विशेष पद्धत किंवा स्टेप्स नसतात. प्रत्येकजण आपापल्या अंदाजामध्ये मस्ती करताना आणि नाचताना दिसत असतो. मग तो भारतातील कोणत्याही भागातला का असेना. लग्नामध्ये लोक फक्त इंजॉय करतात. एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही लग्नामध्ये पहा तुम्हाला नागीण डान्स नक्कीच पाहायला मिळेल.
ग्रामीण भागात नागिन नृत्याला खूप महत्त्व आहे. पण गावागावात आणि शहरात लग्नामध्ये नागीण डांस नसेल तर लग्न अपूर्ण वाटते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरणार नाही. अशामध्ये सध्या एक नागीण डांसचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गावातील वहिनीने आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे, तर भाऊने देखील आपल्या वहिनीला भरपूर नाचवले आहे.
भाऊ आणि वहिनीचा जबरदस्त नागीण डान्स सध्या खूपच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता कि भाऊ आणि वहिनी नागीण डांस करताना दिसत आहेत. गावामध्ये एका फंक्शनमध्ये गर्दी जमली असून या गर्दीत नागीण धून वाजवली जात आहे. वहिनी घुंघटमध्ये आहे आणि भाऊ डोक्यावर रुमाल बांधून वहिनीला साथ देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता कि भाऊचा नागीण डांसवर स्वतःवर ताबा राहिलेला नाही. तो जमिनीवर पडून नाचत आहे. इतकंच नाही तर दोघांमध्ये जणू स्पर्धाच चालू आहे की फक्त मलाच जिंकायचं आहे. भाऊ जमिनीवर पडून नागीण बनला आहे, तर वहिनीही घुंघटच्या आतून आपली जबरदस्त प्रकारे नागीण डांसवर आपली कंबर हलवत अदा दाखवत आहे.
भाऊ आणि वाहिनीच्या या नागीण डांसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो @hamar mati युट्युब चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्येा असा नागीण डांस पाहून लोक देखील खूप हैराण झाले आहेत आणि ते म्हणत आहेत कि पहिल्यांदाच असा नागीण डांस पाहिला आहे.