अनेक खनिजांनी समृद्ध असलेला गुळ हिवाळ्यामध्ये जरूर खाल्ला पाहिजे. गुळ आपल्याला हिवाळ्यामध्ये होणाऱ्या आजारापासून वाचवतो. इम्यूनिटीला स्ट्राँग बनवते. गुळ अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. तुम्ही गुळ पाण्यासोबत, चहासोबत, मिठाईसोबत किंवा चक्की बनवून देखील खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी पहिला गुळ खाणे खूपच फायदेशीर आहे. पुढे जाणून घेऊया रात्री गुळ खाण्याचे फायदे.
सर्दी-तापामध्ये प्रभावी: हिवाळ्यामध्ये गुळापेक्षा प्रभावी कोणतेही औषध नाही. आपल्या घरामधील प्रत्येक सदस्याला गुळाचे सेवन अवश्य करण्यास सांगावे आणि हिवाळ्यामध्ये होणाऱ्या समस्यांना विसरून जावे. गुळ सर्दी, खोकला आणि तापामध्ये आराम देतो. जर तुम्हाला कफची समस्या असेल तर दुध किंवा चहासोबत गुळाचा प्रयोग करावा. गुळासोबत तुळस आणि अदरकचा काढा बनवून पिऊ शकता. घशामध्ये खवखव होत असेल तर गुळाचा काढा बनवून प्यावा आराम मिळतो. यासाठी एक ग्लास पाणी गरम करून यामध्ये एक छोटा गुळाचा तुकडा आणि अदरक वाटून टाकावी. आता याला उकळून पुन्हा थंड करून प्यावे.
सांधेदुखीमध्ये आराम: हिवाळ्यामध्ये वृद्धांना सांधेदुखीचा खूप त्रास होतो. अशामध्ये गुळ खूपच उपयुक्त ठरू शकतो. कच्च्या अदरक सोबत दररोज गुळाचा एक तुकडा खावा, सांधेदुखीमध्ये आराम मिळेल. लहानपणापासूनच मुलांना गुळ खाऊ घातल्यास हाडे मजबूत होतात आणि पुढे जाऊन वेदनांची समस्या देखील दूर होते.
पोटाची समस्या: पोटाच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करणे सोपा आणि फायदेशीर मार्ग आहे. गुळ पाचन क्रिया सुधारण्यास मदत करते आणि गॅस समस्येपासून सुटका देण्यास मदत करते. जेवण केल्यानंतर गुळाचा एक छोटा तुकडा अवश्य खावा.
थंडीपासून बचाव करते: गुळाचा प्रयोग डोंगराळ भागामध्ये खूप केला जातो, कारण गुळ हिवाळ्यामध्ये शरीराला गर्मी देण्याचे देखील काम करतो. हे आपले बॉडी टेंपरेचर कंट्रोल करते. यामध्ये अँटी-एलर्जीचे एलिमेंट आढळतात. अस्थमाच्या पेशंटसाठी गुळ खूपच फायदेशीर असतो. डायबिटीजचे पेशंट जे साखर खात नाहीत त्यांच्यासाठी गुळ एक उत्कृष्ठ विकल्प होऊ शकतो. पण गुळाचे जास्त सेवन तुमच्या आजाराला अधिक वाढवू शकते. कारण यामध्ये गोडाचे प्रमाण अधिक मात्रामध्ये असते जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी साखरेइतकेच नुकसानदायक ठरू शकते.