चित्रपटसृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी निधन, दोनवेळा कँसरवर केली होती मात…

By Viraltm Team

Published on:

मनोरंजन जगतामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्माचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी, २० नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने या जागाच निरोप घेतला. एंड्रिला शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. ती कोमामध्ये थो आणि तिच्या आर्थिक मदतीसाठी बॉलीवूड सिंगर अरिजीत सिंह पुढे आला होता.

२४ वर्षाची अभिनेत्री एंड्रिला शर्माचे रविवारी निधन झाले. मल्टीपल कार्डियक अरेस्टमुळे तिचे निधन झाले. अभिनेत्रीने दुपारी १२.५९ वाजता शेवटचा श्वास घेतला. माहितीनुसार तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. सीपीआर सपोर्ट देखील तिला दिला गेला. तिची अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.

१ नोव्हेंबर २०२२ रोजी एंड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ती अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होती. हॉस्पिटलच्या वाढत्या बोलामुळे ती त्रस्त होती. त्यानंतर बॉलीवूड सिंगर अरिजित सिंगने तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. माहितीनुसार १२ लाखांपेक्षा अधिक हॉस्पिटलचा खर्च झाला आहे.

एंड्रिला शर्माने दोनवेळा कँसरवर मात केली होती पण हृदयविकाराच्या झटक्यावर ती मात करू शकली नाही. कँसरशी लढा जिंकल्यानंतर एंड्रिलाने पुनरागमनही केलं होतं. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर चाहते आणि कोस्टार्स दुखी झाले आहेत आणि सोशल मिडियावर शोक व्यक्त करत आहेत.

एंड्रिला शर्मा मुर्शिदाबाद होती. तिने २००७ मध्ये झुमर या टीव्ही शोमधून डेब्यू केला होता. यानंतर ती जियो काथी, जिबोन ज्योति सारख्या अनेक शोमध्ये दिसली. इतकेच नाही तर ती भगर सारख्या वेब सिरीजमध्ये देखील पाहायला मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

Leave a Comment