चित्रपटसृष्टीमधून आणखी एक वाईट बातमी, प्रसिद्ध अभिनेत्रीची २० दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अयशस्वी, वयाच्या २४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप…

By Viraltm Team

Published on:

बांग्ला फिल्म इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन झाले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. हि बातमी समोर आल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीपासून ते अभिनेत्री एंड्रिलाचे चाहते स्तब्ध झाले आहेत.

ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. ज्यामुळे मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन झाले होते आणि तेव्हापासून ती कोमामध्ये होती आणि व्हेंटिलेटरवर होती. एंड्रिला शर्माला एक नोव्हेंबर रोजी रात्री ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

ती १९ दिवसांपासून जीवन-मरणाची लढाई लढत होती समोर आलेल्या माहितीनुसस्र शनिवारी रात्री अभिनेत्रीला अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे तिची प्रकृती खूपच बिघडली होती. रविवारी दुपारच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.

एंड्रिला शर्माला इतक्या लहान वयामध्ये दोनदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला होता, पण तिने हार मानली नव्हती आणि तिने कॅन्सरची लढाई जिंकली होती. जेव्हा एंड्रिया शर्माला दुसऱ्यांदा कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा तिने गंभीर शस्त्रक्रिया पूर्ण करून घेतली होती.

त्यादरम्यान तिच्यावर कीमोथेरेपीचे सेशन देखील झाले होते, ज्यानंतर डॉक्टरांनी तो पूर्णपणे बरे असल्याचे सांगितले होते. एंड्रिला शर्माच्या अभिनय करियरबद्दल बोलायचे झाले तर तिने टीव्ही पासून ते ओटीटीपर्यंत सर्व स्तरावर काम केले होते. एंड्रिला शर्माने छोट्या पडद्यावरून आपल्या करियरची सुरुवात केली होती. सर्वात पहिला ती झुमर या टीव्ही शोमध्ये दिसली होती आणि यानंतर तिने अनेक पॉपुलर शोजमध्ये मुख्य भूमिका केल्या.

Leave a Comment