आलिया-बिपाशानंतर आता ‘बालिका वधू’ फेम ‘हि’ होणार आई, बॅकलेस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केले बेबी बंप…

By Viraltm Team

Published on:

अभिनय जगतामध्ये यावेळी एकामागून एक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. डोली अरमानों की, बालिका वधू आणि देवों के देव महादेव सारख्या सिरियल्समध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा मर्दा देखील आई होणार आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेयर करून चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे.

नेहा मर्दाने पती आयुष्मान अग्रवालसोबत एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेयर करत अभिनेत्री नेहा मर्दाने सांगितले आहे कि २०२३ पर्यंत ती बाळाचे स्वागत करणार आहे.

अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिले आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं… शेवटी देव माझ्यामध्ये आले…२०२३ मध्ये बेबी येणार आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांसोबत सेलेब्स देखील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

नेहा मर्दाने आनंदाची बातमी शेयर केल्यानंतर श्रेनु पारिखने तिच्या पोस्टवर आपली प्रतिक्रीय देताना लिहिले आहे कि, तुमच्या दोघांसाठी मी खूपच खुस आहे. अशाच प्रकारे अभिनेत्री मीरा मिश्रा ने कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे, ‘ओह माय गॉड…अभिनंदन माय लव’. इतर अनेक सेलेब्स आणि चाहते देखी कपलला शुभेच्छा देत आहेत.

नेहा मर्दा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने १० फेब्रुवारी २०१२ मध्ये पटना स्थित बिजनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले होते. आता लग्नाच्या दहा वर्षानंतर ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Marda (@nehamarda)

Leave a Comment