तरुण वयामध्येच होऊ शकतो उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष…

By Viraltm Team

Published on:

बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या आरोग्याच्या मोठा शत्रू आहे, आधी हि समस्या मिडल इज ग्रुपच्या लोकांना व्हायची, ज्यामध्ये त्यांना हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, डायबिटीज आणि हार्ट डिजीजचा सामना करावा लागत होता, पण गेल्या काही काळापासून अनेक तरून हृदयरोग, ते ब्रेन स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचे बळी ठरत आहेत. यासाठी हे जरुरीचे आहे कि तुम्ही एलडीएलच्या लक्षणांना योग्य वेळी समजून घ्यावे. याला दुर्लक्ष करणे खूपच धोकादायक ठरू शकते.

तरुण वयात उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे
घाम येणे आणि अस्वस्थ वाटणे: उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये घाम येणे नॉर्मल आहे पण जर तुम्हाला नॉर्मल रूम टेम्प्रेचर किंवा हिवाळ्यामध्ये घाम्म येत असेल तर समजून जा कि हे एखाद्या मोठ्या धोक्याचे लक्षण आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुले हार्ट पर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही, ज्यामुळे विनाकारण घाम येतो आणि अस्वस्थ वाटू लागते.

पायऱ्या चढताना धाप लागणे: जर तुमचे वय २५ ते ३० दरम्यान असेल तर तुम्हाला फिजिकल एक्टिविटीज करताना जास्त त्रास होऊ नये. काही तरुण २ मजली देखील पायऱ्या चढू शकत नाहीत. यादरम्यान त्यांना खूप धाप लागू लागते. हे उच्च कोलेस्टेरॉलची एक पूर्वसूचना असू शकते.

डोळ्यांभोवती पिवळी वर्तुळे: जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढते तेव्हा डोळ्यांच्या आसपासची त्वचा पिवळी पडू लागते पिवळे वर्तुळे दिसू लागतात. रक्तामध्ये प्रमाणापेक्षा जास्त चरबी जमा झाल्यामुले असे होते ते खूपच धोकादायक असते.

शरीराच्या अनेक भागात वेदना: हाय कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतात. ज्यामुळे शरीराच्या नाके भागांमध्ये ब्लड सर्कुलेशन प्रभावित होते. अशामध्ये तुम्हाला पाय, मान, हात आणि जबड्यामध्ये वेदना होऊ लागतात.

कोलेस्ट्रॉल वाढल्याचे कसे माहिती करून घ्यायचे: हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण सामान्यतः तेव्हा दिसून येतात जेव्हा हे प्रमाणाच्या बाहेर होते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही नियमित लिपिड प्रोफाइल टेस्ट करत राहावे. यामध्ये रक्तांचे नमुने घेतले जातात. ज्याद्वारे हे समजते कि यामध्ये फॅट किंवा प्लाकची मात्रा जास्त आहे का नाही. अशाप्रकारे तुम्ही धोका वाढण्यापूर्वी थांबवू शकता.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment