जुळ्या बहिणींसोबत लग्न करणारा तो तरून निघाला ४२० धोकेबाज, कारनामा ऐकून तुम्ही देखील शॉक व्हाल…

By Viraltm Team

Published on:

मूळचा महाळुंग परिसरातील अतुल आवताडे या तरुणाने जुळ्या बहिणींसोबत लग्न केल्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोहल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अनेकांनी तरुणाची खिल्ली उडवली तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्ती केली आहे. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाच्या आनंदावर पाणी फिरले आहे.

महिला आयोगाने याची चौकशी करायचे आदेश दिले आहेत. पण आता पोलीस चौकशीमध्ये काही वेगळीच माहिती समोर आली आहे, जे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. दोन जुळ्या मुलींसोबत लग्न केलेल्या अतुल अवताडेचे याआधी पहिले लग्न झाले आहे. पोलिसांचा चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अतुलचे आधीच लग्न झाले होते, त्याच्या पहिल्या पत्नीनेने महिला आयोगाकडे याची तक्रार केली आहे. त्यामुळे आता अतुल अवताडे चांगलाच पेचात अडकला आहे. अतुलसोबत आता त्या दोघी जुळ्या बहिणींवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. पोलीस आता या प्रकरणामध्ये कसून चौकशी करत आहेत.

अतुल अवताडे सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील मुळचा रहिवाशी आहे. तो मुंबईमध्ये ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. त्याच्यासोबत लग्न करणाऱ्या जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी पाडगावकर आयटी इंजिनिअर आहेत. बालपणापासून एकत्र राहिलेल्या दोघी बहिणींना शेवटपर्यंत एकत्र राहायचे आहे म्हणून त्यांनी एकाच तरुणासोबत लग्न केले आहे.

अकलूज येथील वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे २ डिसेंबर २०२२ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. रिंकी आणि पिंकीच्या आईच्या आजारपणामध्ये अतुलने खूप मदत केली होती. दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला होता ज्यानंतर दोघींनी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आता पोलीस चौकशीमध्ये अतुलचे आधीच लग्न झाल्याची माहिती समोर आल्यामुळे आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे याबद्दल तक्रार केली आहे. आता पुढे या प्रकरणाला कोणते वेगळे वळण मिळते हि येणारी वेळ ठरवेल.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment