प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीला खरी ओळख आई कुठे काय करते सिरीयलमध्ये अनघाच्या भूमिकेमुळे मिळाले. अश्विनीचा खूपच मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडियावर देखील ती नेहमी सक्रीय राहते.
सध्या अश्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे आणि शोक व्यक्त केला आहे. अश्विनीचा मानलेला भाऊ मंगेशचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने त्याच्यासोबतचा एक फोटो शेयर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि एखादा माणूस जेव्हा आपल्यामध्ये असतो म्हणजे काय ? त्याच्या चांगल्या गोष्टींसोबत त्याच्या वाईट गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजेच चांगला माणूस असतो का? प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो, ध्येय ठरते”
मंगेशची “दिदू” झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ देवू शकले नाही. बहीण म्हणून कमी पडलेच. आपला माणूस म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसहित स्विकारता आलेच नाही कदाचित.
माणूस निघून गेला की समजते की गेला तो माझा होता, त्याच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्याला महत्व होते, मला अजून थोडा वेळ हवा होता, मी घेतले असते समजून…पण वेळ पुढे सरकलेला असतो. मंगेश.. आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. मनावरचे ओझे जगू देईल का आम्हाला.
View this post on Instagram