मनोरंजनसृष्टीमधील अनेक कलाकारांनी यावर्षी या जगामधून एक्झिट घेतली आहे. यामध्ये आता अजून एका दिग्गज अभिनेत्याचे नाव सामील झाले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता अरविंद धनु यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४७ च्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अशी अचानक एक्झिट चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं सिरीयलमधून अरविंद हे घराघरामध्ये लोकप्रिय झाले होते. सिरीयलमध्ये त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका केली होती. सोमवारी ते एका कार्यक्रमासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाब आणि त्यामध्ये ब्रेन स्ट्रोक यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर काही वेळामध्येच त्यांचे निधन झाले.
सुख म्हणजे नक्की काय असते सिरीयलमधील त्यांची खलनायकची भूमिका चांगलीच गाजली होती. याशिवाय ते लेक माझी लाडकी, क्राइम पेट्रोल यासारख्या सिरियल्समध्ये देखील काम करताना दिसले होते. त्याचबरोबर एक होता वाल्या या मराठी चित्रपटामध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. मुंबईमधील माहीम येथीळ स्मशानभूमीत त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले. यावेळी अनेक दिग्गज कलाकार देखील तेथे उपस्थित होते. अनेक कलाकारांनी दुख व्यक्त करत म्हंटले आहे कि त्यांच्या जाण्यानी सिनेसृष्टीमधून जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे खूपच कठीण आहे.