साऊथची फेमस अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच अडकणार विवाहबंधनात, ‘या’ दिग्दर्शकासोबत करणार लग्न…

By Viraltm Team

Published on:

बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहेत. हि बातमी समोर आली होती कि ३९ वर्षीय अभिनेत्री दुबईच्या एका व्यवसायिकासोबत लग्न करणार आहे. पण हि बातमी फेक निघाली. इंडस्ट्रीमध्ये सध्या चर्चा अशी होत आहे कि अनुष्का एका तेलगु दिग्दर्शकासोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. ज्याच्यासोबत तिने दोन हिट चित्रपट दिले आहेत. माहितीनुसार लग्न जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अनुष्काचे नाव अनेक दिग्गज सेलेब्स सोबत जोडले गेले आहे. बाहुबली नंतर तिच्या प्रभाससोबतच्या रिलेशनच्या अफवा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. त्यानंतर ३९ वर्षी अभिनेत्रीने यावर मौन सोडत या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते.

तिने म्हंटले होते कि मी प्रभासला १५ वर्षा पासून ओळखते आणि ती माझा एक चांगला मित्र आहे. आम्ही फक्त मित्र म्हणून जवळ आहोत. जर आमच्या दोघांमध्ये काही असते तर ते कधीच सर्वांच्या समोर आले असते. यासाठी अशी माहिती समोर आली होती कि अभिनेत्री हैदराबादच्या एका व्यावसायिकासोबत लग्न करू इच्छिते.

पण हि देखील एक निव्वळ अफवा होती. अशी देखील अफवा होती कि अनुष्का एका क्रिकेटरवर प्रेम करते जो साऊथ इंडियन टीमसाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळतो. पण तिने याचे देखील खंडन केले आणि म्हंटले कि जेव्हा माझे लग्न निश्चित होईल तेव्हा मी सर्वांना सांगेन.

सध्या अभिनेत्रीचे चाहते तिच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. माहितीनुसार एका लोकप्रिय सेलिब्रिटी ज्योतिषीने भविष्यवाणी केली आहे कि अभिनेत्री लवकरच विवाहबंधनामध्ये अडकू शकते. ती २०२२-२३ मध्ये लग्न करेल. पंडित जगन्नाथ गुरुजीने म्हंटले आहे कि अनुष्काचा भावी पती हा फिल्म इंडस्ट्रीमधून नसेल तर तो दुसऱ्या क्षेत्रामधील सफल व्यक्ती असणार आहे.

Leave a Comment