साउथ फिल्म इंडस्ट्रीची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तिचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अनुष्काचा जन्म ७ नोव्हेंबर १९८१ रोजी झाला होता. अनुष्का या वर्षी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशामध्ये अनुष्काच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल काही रंगक गोष्टी जाणून घेऊया.
खूपच कमी लोकांना माहिती आहे कि अनुष्का शेट्टीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. चित्रपटांमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव अनुष्का ठेवले. अनुष्काने २००५ मध्ये सुपर या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तिच्या कुटुंबामधून कोणीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. तरीही आज अनुष्काने आपल्या मेहनतीच्या बळावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमवले आहे.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अनुष्का शेट्टी मंगळूर येथे एक योगा इंस्ट्रक्टरचे काम करत होती. तिची सुंदरता पाहून एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटांमध्ये येण्याची ऑफर दिली. ज्यानंतर अनुष्काने २००५ मध्ये आपला सुपर हा पहिला चित्रपट केला. यानंतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनुष्काचा सर्वात सुपरहिट चित्रपट बाहुबली होता ज्यामुळे तिला अमाप लोकप्रियता मिळाली.
बाहुबलीमध्ये साकारलेली तिची देवसेनाची भूमिका इतकी लोकप्रिय झाली कि तिला याच नावाने ओळखले जाऊ लागले. या चित्रपटांला दर्शकांनी खूपच पसंती दिली. या चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्काच्या अफेयरच्या अनेक चर्चा समोर आल्या होत्या. तथापि त्यांनी वेळेआधीच या चर्चांना पूर्णविराम देत उघडपणे वक्तव्य केले कि ते फक्त एक चांगले मित्र आहेत. तिने सांगितले कि गेल्या १५ वर्षापासून ती प्रभासला ओळखते आणि प्रभास तिचा एक चांगला मित्र आहे.
अभिनेत्री अनुष्काचा साइज जीरो हा चित्रपट तिच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. २०१० मध्ये आलेल्या सिंघम २ चित्रपटामध्ये देखील अनुष्काने आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन केले होते. २००९ मध्ये ती बिल्ला या चित्रपटामध्ये प्रभास सोबत काम करताना पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानच त्यांच्या अफेयरच्या चर्चा समोर आल्या होत्या.