Ankita Lokhande Pregnancy Test In Bigg Boss 17 House: टीव्हीवरील हिट अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या रियालिटी शो Big Boss 17 मध्ये पाहायला मिळत आहे. अंकिताने या शोमध्ये पती विक्की जैनसोबत एंट्री घेतली होती. शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांचे प्रेम आणि संघर्ष दोन्ही पाहायला मिळत आहे. कधी कधी अंकिता आणि विक्की एकमेकांवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळतात तर कधी कधी एकमेकांसोबत भांडताना पाहायला मिळतात.
नुकतेच शोदरम्यान अंकिता लोखंडेची तब्येत बिघडल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यानंतर तिची Pregnancy Test झाली. याचा खुलासा स्वतः अंकितानेच Big Boss च्या घरामध्ये पती विक्की जैन समोर केला होता. आता अंकिता लोखंडेच्या टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे, ज्याची चाहते आतुरतने वाट पाहत होते.
अंकिता लोखंडे Pregnancy Test Report
वास्तविक बिग बॉस १७ (Bigg Boss 17) मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ची प्रेग्नंसी टेस्ट गेल्या आठवड्यामध्ये झाली होती. या टेस्टनंतर ती हा रियालिटी शो सोडणार असल्याचा दावा केला जात होता, पण आता असे काही होणार नाही. अंकिता लोखंडेची प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
रिपोर्टनुसार असा दावा केला जात होता कि अंकिता लोखंडेच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या, ज्यानंतर आता तिला सांगितले गेले आहे कि निगेटिव्ह आहे. अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) जिग्ना वोरा आणि रिंकू धवनच्या समोर देखील आपली हालत सांगितली होती ज्यानंतर दोघे खूपच उत्साहित झाले होते. रिंकू आणि जीग्नाने अंकिताची खूप चेष्टा केली होती.
कसा आहे Big Boss मध्ये अंकिता लोखंडेचा गेम
बिग बॉस 17 (Big Boss 17) मध्ये सहा आठवडे गेले आहेत आणि अंकिता लोखंडे गेममध्ये व्यवस्थित दिसू लागली आहे. आतापर्यंत अंकिता तिचा पती विक्की जैनसोबत दिसत होती. विक्कीला गेममध्ये माईंडचा टॅग मिळाला, पण अंकिता मूर्ख दिसू लागली. मात्र बिग बॉसकडून मिळत असलेल्या थेरेपीनंतर अंकिता आता विक्कीपेक्षा वेगळी खेळत आहे. ती नेहमी आपले मुद्दे मांडत असते.