Animal OTT Release: ओटीटी वर लवकरच पाहायला मिळणार रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट, या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

By Viraltm Team

Published on:

Animal OTT Release

Animal OTT Release: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या धमाकेदार चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ सध्या दर्शकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. चित्रप पाहण्यासाठी दर्शक मोठ्या संख्येने चित्रपटगृहामध्ये पोहोचत आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपट बंपर कमाई करत आहे. चित्रपटाने चार दिवसांमध्येच 400 करोडचा आकडा पार केला आहे. यादरम्यान आता ‘अ‍ॅनिमल’ संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे, ज्यानंतर चाहत्यांना आणखी आनंद होणार आहे. नुकतेच एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे कि ‘अ‍ॅनिमल’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Animal OTT Release- या OTT प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅनिमल’ होणार रिलीज

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा चित्रपट मोठ्या पडद्यानंतर आता ओटीटी धमाल करण्याच्या तयारीत आहे. Animal OTT Release बद्दल नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. ‘अ‍ॅनिमल’ च्या मेकर्सनी नेटफ्लिक्ससोबत ओटीटी रिलीजची चर्चा केली आहे. बातमीनुसार 45 ते 60 दिवसांमध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि मकर संक्रांतिच्या मुहूर्तावर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी दोन तारखांची चर्चा सुरू आहे. पहिली तारीख 14 जानेवारी आहे तर दुसरी तारीख 15 जानेवारी आहे. तथापि निर्मात्यांनी अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Animal OTT Release

‘अ‍ॅनिमल’ ने मोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने ओपनिंग डेलाच सनी देओलच्या गदर 2 चा रेकॉर्ड मोडला होता. चित्रपटाने दोनच दिवसांमध्ये 200 करोडची कमाई केली होती. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या (Animal OTT Release) ओटीटी रिलीजबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.

Animal movie पाहिल्यानंतर Alia Bhatt ची अशी होती प्रतिक्रिया, Ranbir Kapoor च्या चित्रपटासाठी केले ‘हे’ वक्तव्य

Leave a Comment