सिनेरुष्टीचा त्याग करत ‘हि’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झालीय कृष्णभक्तीत लीन, आता ओळखणे देखील झालेय कठीण…

By Viraltm Team

Published on:

सिनेसृष्टीमध्ये काम करण्यासाठी अनेक लोक काय काय करण्यासाठी तयार असतात. अनेक लोक कलाकारांचे आयुष्य पाहून किंवा त्यांना मिळणारे मानधन पाहून सिनेसृष्टीकडे आकर्षित होतात. कुणासाठी तर त्यांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी भारावून टाकते.

प्रत्येकासाठी सिनेसृष्टीचे कुतूहल वाटण्याची अनेक करणे आहेत. पण याला एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्धी मिळवल्या नंतर देखील या इंडस्ट्रीमधील काढता पाय घेतला.

यापैकीच एक अभिनेत्री आहे जिचे नाव अनघा भोसले असे आहे. अनुपमा या सिरीयलमध्ये नंदिनीची भूमिका साकारून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पण अनघा आता चित्रपट सृष्टीपासून फार दूर गेली आहे पण सोशल मिडियावर ती नेहमी सक्रीय असते.

सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असली तरी तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. इतकेच नाही तर तिचे रूप इतके बदलले आहे कि तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. अनघाने स्वतःला कृष्णभक्तीमध्ये लीन करून घेतले आहे.

श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन होत सृष्टीतील प्रत्येक जीवावर प्रेम करण्याची शिकवण सर्वांना देण्याचे काम करत आहे. जीवनामध्ये ती समाधान आणि आनंदाच्या वळणावर पोहोचण्यासाठीचे अनेक सोपे उपाय असतात हे देखील सांगताना ती पाहायला मिळते.

अनघाने जेव्हापासून अध्यात्माच्या मार्गाची निवड केली आहे तेव्हापासून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. तिच्या राहणीमानामध्ये देखील कमालीचा बदल झालेला आहे. सौम्य रंगांचे कपडे, कपाळावर कृष्णभक्तीचा टिळा, गळ्यात तुळशीमाळ, हातात जपमाळ आणि चेहऱ्यावर प्रसन्नमुद्रा असं तिचं रुप पाहण्याजोगे आहे. अनेक लोकांना तिच्यामध्ये झालेला हा बद्दल थक्क करतो.

Leave a Comment