अमृता खानविलकरच्या ‘त्या’ कृत्यामुळे भडकले नेटकरी, म्हणाले; ‘पैसा आल्यावर इतका भिकारडेपणा…’

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. अमृता खानविलकर हि नेहमी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेमध्ये असते. अमृता सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असलेली पाहायला मिळते. मराठी सोबतच बॉलीवूडमध्ये देखील अभिनेत्रीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. अमृताने नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान हजेरी लावली होती. मात्र यावेळी तिच्या तिच्या कपड्यांमुळे खूपच शरमिंदा व्हावे लागले. लोकांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

राजश्री मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्री अमृता खानविलकरचा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. या सोहळ्यामध्ये अमृताने देखील हजेरी लावली होती. यावेळी ती लाल रंगाच्या स्कर्ट पँटच्या एक वेस्टर्न ड्रेस मध्ये पाहायला मिळाली. यासोबत तिने गळ्यामध्ये साधी चैन आणि थोडा मेकअप केला होता. विशेष म्हणजे तिने या आउटफिटसाठी साजेशी हेयर स्टाईल केली होती.

अमृताने घातलेला हा ड्रेस खूपच बोल्ड होता. यामुळे तिला सोशल मिडिया युजर्सनी ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत लोक तिला म्हणाले कि ताई तुम्ही मराठीमधील नामवंत कलाकार आहात असे कपडे तुम्हाला शोभत नाहीत. तर काहींची कमेंट करून तिला मराठी संस्कृती जपण्यासाठी सांगितले आहे. तर गरीबसुद्धा अंग झाकायला मागे पुढे करत नाही आणि अतोनात पैसा आल्यावर एवढा भिकारडेपणा…”, अशी संतप्त कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

तर एकाने कमेंट करत लिहिले आहे कि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार त्यांची संस्कृती जपतात आणि आपल्याकडेच दुसऱ्यांची संस्कृती जपत आहेत. बॉलीवूड हॉलीवूडला कॉपी करते मराठी कलाकार बॉलीवूडमधील कलाकारांना कॉपी करतात. असे देखील एका युजरने म्हंटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

Leave a Comment