मराठी सिनेसृष्टी ‘हा’द र’ली’ ! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे नि’ धन, भावूक पोस्ट शेयर करून दिली माहिती…

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री अमृताच्या मावशीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने याची माहिती आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करू दिली आहे. भावूक पोस्ट शेयर करत अभिनेत्रीने आपल्या मावशीला श्रद्धांजली वाहिली आहे.

सोशल मिडियावर शेयर केलेली पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. मावशीचे निधन झाल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरने पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि, “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही मनसोक्त आईसक्रीम खा… छान रहा… नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा… तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांसाठी… आमच्या कुटुंबासाठी त्याची परतफेड आम्ही कोणी करूच शकत नाही.

मम्मा, मी, अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो. माऊ तुला खूप मिस करणार गं तुला…. अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं… मॉमला, मला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता. तू काळजी करू नकोस.”

अमृता आपल्या पोस्तमध्ये पुढे लिहिले कि, आज तुला अशा अवस्थेमध्ये पाहून खुपच दुख होत आहे. तू माझी मावशीच नव्हतीस तर माझी आई सुद्धा होतीस. आयुष्याच्या कठीण काळामध्ये तू ज्याप्रमाणे खंबीरपणे उभी राहिलीस आणि कुटुंबाला सावरलेस त्यामधून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली. आम्हाला खाऊ घालण्यापासून ते करियरमध्ये पुढे जाण्यासाठी तू नेहमी पाठींबा दिलास. तू नेहमी राहशील. मला माहिती आहे तू ज्या ठिकाणी आहेस तिथे आता शांत आराम करत असशील. मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. आईची काळजी करू नकोस मी सांभाळेन तिला. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

खूपच भावूक होत अभिनेत्रीने हि पोस्ट शेयर केली आहे. अभिनेत्रीने शेयर केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या मावशीचे फोटो देखील शेयर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये तिची आई तिच्या मावशीसोबत पाहायला मिळत आहे.

Leave a Comment