देशातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन, १०० करोडचे घर, प्राईव्हेट जेट, अशी आहे अल्लू अर्जुनची लाईफस्टाईल…

By Viraltm Team

Published on:

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनचा शानदार अभिनय आणि त्यासोबत केलेले उत्कृष्ट प्रदर्शन यामुळे त्याचे खूपच कोतूक होत आहे. या सुपरहिट चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने मोठी रक्कम वसूल केली आहे. अल्लू अर्जुनची एक वेगळी स्टाईल आहे ज्यामुळे त्याने लाखो लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. त्याचे चाहते फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशांमध्ये देखील आहेत.

अल्लू अर्जुन आपल्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहतो. त्याला खूप महागड्या कार्सची आवड आहे. त्याच्याजवळ रेंज रोवर कार आहे ज्याची किंमत २.५० करोड रुपये इतकी आहे. याशिवाय ८० लाखाची बीएमडब्ल्यू एक्स ५ जगुआर एक्सजे एल, ऑडी ए७ या कार्सदेखील त्याच्याजवळ आहे. कार तर सोडाच अल्लू अर्जुनजवळ एक स्वतःचे प्राईव्हेट जेट देखील आहे. फॅमिली हॉलिडेच्या अनेक फोटोमध्ये अभिनेत्याने स्वतः याचा खुलासा केला आहे.

अल्लू अर्जुनजवळ भारतामधील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे. अल्लू अर्जुनने २०१९ मध्ये हि व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली होती, जिचे नाव त्याने फाल्कोन ठेवले आहे. हि व्हॅनिटी व्हॅन बाहेरून जितकी सुंदर दिसते तितकीच ती आतून देखील आलिशान आहे.

ज्याचे फोटो पाहून तुमच्या देखील भुवया उंचावतील. व्हॅनिटी व्हॅन खूपच स्पेशियस आहे जे याचे सर्वात मोठे फिचर आहे. याशिवाय व्हॅनिटी व्हॅनमध्ये हाई टेक एलईडी लाइट्स लावले गेले आहेत ज्यामुळे प्रकाश देखील कमी राहत नाही. या व्हॅनिटी व्हॅनमची किंमत ७ करोड रुपये आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अल्लू अर्जुनच्या घराची चर्चा देखील झाली होती. हैदराबादच्या पाॅश भाग जुबली हिल्समध्ये अल्लू अर्जुनचे आलिशान घर आहे. या घराची किंमत १०० करोड रुपये. त्याने घराचे डेकोरेशन पॉपुलर इंटीरियर डिजाइनर आमिर आणि हामिदा कडून करून घेतले आहे. इथे तो आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत राहतो.

माहितीनुसार अभिनेता अल्लू अर्जुनचे नेट वर्थ जवळजवळ ३५० करोड रुपये आहे. अल्लू अर्जुनचे वार्षिक उत्पन्न ३२ करोड रुपये पेक्षा जात आहे. आलू अर्जुनचे हैदराबाद मध्ये एक आलीशान घर आहे आणि याशिवाय एक ऑफिस आणि नाइट क्लब देखील आहे ज्याचे नाव ८०० जुबली आहे.

Leave a Comment