बॉलीवूड नाही तर ‘साउथ फिल्म इंडस्ट्री’ला ‘मराठी चित्रपटा’ची भुरळ, साउथचा ‘हा’ दिग्गज अभिनेता मराठी चित्रपटामध्ये करणार काम…

By Viraltm Team

Published on:

दीपक राणे फिल्म्स इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरला दर्शकांमधून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कन्नड अभिनेता कवीश शेट्टीचा लुक लोकांच्या चांगलाच प्रसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपट इतर भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्याने याचे खूपच कौतुक होत आहे.

निर्माता दीपक पांडुरंग राणे यांच्या या चित्रपटाचे सर्वस्तरामधून कौतुक केले जात आहे. अभिनेता एड गुरू भरत दाभोळकर, अभिनेत्री अश्विनी भावे, दिग्दर्शक समित कक्कड, गायिका प्रियांका बर्वे आणि सावनी रविंद्र, या शिवाय सोनाली खरे, ऐश्वर्या नारकर, तेजस्विनी पंडित, संदीप पाठक, अक्षया नाईक, पल्लवी सुभाष, दीप्ती देवी यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून या चित्रपटासाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

पोस्टर सोशल मिडियावर शेयर केल्यानंतर नेटक-यांनी यावर भरभरून कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला. मराठी दर्शकांना वेगवेगळे विषय पाहायला पाहायला आवडतात हे या प्रतिक्रियांच्या माध्यमातून समोर आले आहे. आपला मराठी चित्रपट देखील इतर भाषेमध्ये प्रदर्शित होणार यामुळे प्रेक्षकांनी याचे स्वागत केले आहे.

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेमध्ये चित्रित केला गेला आहे. तर हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळम या भाषेमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये कन्नड अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी आणि मराठीमधील शिवानी सुर्वे, विराट मडके हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

उत्कृष्ट निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ते आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. मराठी चित्रपट देखील आपल्या सीमा ओलाक्डू शकतो हे चित्रपटामधून सिद्ध होत आहे. यामुळे मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment