आपल्या मागे इतक्या करोडची संपत्ती सोडून गेली तुनिशा, वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जगत होती इतकी आलिशान लाईफ…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तुनिशा शर्मा आता आपल्यामध्ये नाही. तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तुनिशा शर्मा फक्त २० वर्षाची होती आणि तिने इतक्या छोट्या वयामध्ये टीव्ही जगतामध्ये मोठे स्थान मिळवले होते. इतकेच नाही तर ती इतक्या छोट्या वयामध्ये करोडोची मालकीण होती.

४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या तनिषा शर्माने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. यानंतर तिने भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली. तिला डांसची देखील खूप आवड होती आणि नेहमी आपले डांस व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करत होती.

तुनिशाने शेर-ए-पंजाब: महाराजा रंजीत सिंह, हीरो- गायब मोड़ ओन, इंटरनेट वाला लव, इश्क शुभानअल्लाह, गब्बर पूंछवाला सारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले होते. २० व्या वर्षी तुनिशाने फक्त टीव्ही सिरियल्सच नाही तर कहानी २, बार-बार देखो, दबंग ३, फितूर सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

तुनिशाने २४ डिसेंबरच्या रात्री बॉयफ्रेंड शिजान मोहम्मद खानच्या मेकअप रूममध्ये जाऊन आ त्मह त्या केली. माहितीनुसार तुनिशा अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. असे देखील म्हंटले जात आहे कि ती प्रेग्नंट होती आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता ज्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिने आ त्मह त्या केली.

तथापि या प्रकरणामध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबाकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. तुनिशा एका टीव्ही सिरीयलसाठी लाखो रुपये घेत होती. याशिवाय ती अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे, ज्याद्वारे ती मोठी कमाई करत होती. माहितीनुसार तुनिशा शर्मा जवळ जवळ १५ करोड रुपयाची मालकीण होती. याशिवाय तिच्याजवळ स्वतःचे एक आलिशान घर देखील होते ज्याची किंमत करोडोमध्ये सांगितली जाते. याशिवाय तुनिशाजवळ लक्झरी कार्स देखील होत्या ज्यामध्ये बीएमडब्ल्यू पासून रेंज रोवर पर्यंत सामील आहेत.

अभिनेत्रीला लक्झरी लाईफ जगण्याची आवड होती. ती सोशल मिडियावर नेहमी आपले स्टाईलिश फोटो शेयर करत होती. तुनिशा सध्या अलीबाबा टीव्ही शोमध्ये पाहायला मिळत होती. या शोमध्ये तुनिशासोबत शिजान खान देखील मुख्य भूमिकेमध्ये होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

Leave a Comment