४१ वर्षाची ‘ही’ अभिनेत्री झाली आहे २ जुळ्या मुलांची आई , प्रेग्नंसी मधील ‘बो ल्ड’ फोटो शेयर करून आली होती चर्चेत…

By Viraltm Team

Published on:

साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार ४१ वर्षाची अभिनेत्री नमिता वंकावाला जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिने आपल्या जुळ्या मुलांची आनंदाची बातमी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर शेयर केली आहे. तिने पती आणि दोन्ही मुलांसोबत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेयर केला आहे.

व्हिडीओ शेयर करताना अभिनेत्री नमिताने एक लांबीलचक पोस्ट लिहिली आहे आणि सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नमिता लग्नाच्या ६ वर्षानंतर आई झाली आहे. तिने २०१७ मध्ये मल्लिरेड्डी वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केले होते. नमिताने प्रेग्नंसीदरम्यान बेबी बंपसोबत अनेक फोटोशूट देखील केले होते आणि तिचे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते.

नमिताने आपला इंस्टाग्राम व्हिडीओ शेयर करताना लिहिले आहे कि, हरे कृष्ण, या शुभप्रसंगी तुमच्यासोबत माझा आनंद शेयर करताना मी खूपच उत्साहित आहे. आम्ही जुळ्या मुलांचे पॅरेंट्स बनलो आहोत. आम्हाला अशा आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत नेहमीच राहतील. तिने पोस्टद्वारे हॉस्पिटलचे देखील आभार मानले आहेत.

तिने लिहिले हे कि मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रोमपेटच्या त्यांच्या उत्कृष्ट आरोग्य सेवांसाठी आभारी आहे. मी डॉ. भुवनेश्वरी आणि त्यांच्या टीमची ऋणी आहे ज्यांनी माझ्या प्रेग्नंसीच्या जर्नीदरम्यान माझ्या मुलांना या जगामध्ये आणण्यासाठी चांगल्या प्रकारे गाईड केले. डॉ. ईश्वर आणि डॉ. वेल्लू मुर्गन मला माझ्या मदरहुडमध्ये देखील मदत करत आहेत. सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

नमिताच्या पोस्ट वर अनेक साउथ सेलेब्स कमेंट्स करत तिला शुभेच्छा देत आहेत. खुशबू सुंदरनने लिहिले आहे कि, स्वीट नामी, तुझ्यासाठी मी खूपच खुश आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. देव तुला आणि तुझ्या मुलांना आशीर्वाद देवो. खूप खूप प्रेम.

नमिताने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या स्टाईलचे चाहते फॅन आहेत. काही चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त आयटम नंबरही केले आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबत तिने राजकारणामध्ये देखील प्रवेश केला आहे. नमिताने भाजपमध्येही प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये तिने मल्लिरेड्डी वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केले होते. नमिताने आपल्या प्रेग्नंसी पीरियडला खूप एन्जॉय केले होते.

Leave a Comment