सिनेसृष्टी पुन्हा हा’द’रली ! ‘या’ प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीने राहत्या घरी ग’ळफा’स घेऊन केली आ’त्मह’त्या…

By Viraltm Team

Published on:

कोलकातामध्ये मॉडेल आणि अभिनेत्रींच्या आत्महत्येची घटना अजून देखील थांबलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मॉडलनी मृत्यूला कवटाळले असून आता आणखी एका मॉडेलच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. कोलकातामधील प्रसिद्ध मॉडेल पूजा सरकार हिने आत्महत्या केली आहे. माहितीनुसार पूजा २१ वर्षांची होती आणि ती कोलकातामध्ये खूपच फेमस होती.

रविवारी पूजा सरकारचा मृतदेह तिच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. पूजा तिथे भाड्याने राहत होती. पूजा शनिवारी आपल्या मित्राला शेवटची भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. मित्राला भेटल्यानंतर पूजाने स्वतःला खोलीत बंद केले ज्यानंतर स्थानिकांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. जेव्हा पोलिसांनी तिथे येऊन तपास केला तेव्हा त्यांना पूजाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांना पूजाच्या खोलीत सुसाईड नोट देखील मिळाली. तथापि या नोटमध्ये पूजाने आपल्या आत्महत्येचे कारण सांगितलेले नाही. पण पोलीस तपासात दावा केला जात आहे कि पूजाने मृत्यूपूर्वी आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बातचीत केली होती.

पूजा सरकार मॉडलिंगमध्ये आपले करियर बनवण्यासोबत शिकत देखील होती. ती पश्चिम बंगाल स्थित गोबरडांगा कॉलेजमध्ये फर्स्ट ईयर स्टूडेंट होती आणि तिचे घर कोलकातामध्ये बंसद्रोणी भागात होते. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोलकातामधून समोर आलेले हे काही पहिले प्रकरण नाही, ज्यामध्ये मॉडलने आपले आयुष्य संपवले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मॉडल आणि अभिनेत्रींनी हे पाऊल उचलून सर्वानांच मोठा धक्का दिला आहे. पूजा सरकारआधी बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे, मंजुषा नियोगी आणि सरस्वती दास यांच्या आत्महत्येने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती.

Leave a Comment