…तर तुम्हाला चार लोकांसोबत… ‘या’अभिनेत्रीने सांगितला फिल्म इंडस्ट्रीमधील कटू अनुभव…

By Viraltm Team

Published on:

मराठी सिनेमा जरा फेमस होत गेला तस तसे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील ग्लॅमर देखील वाढत गेले. याच ग्लॅमरला भुलून अनेक निर्माते, दिग्दर्शक मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे वळाले. फिल्म इंडस्ट्रीमधील हि चांगली बाजू दिसत असली तरी त्याला वाईट बाजू देखील आहे.

हिंदीबरोबरच इतर भाषेमध्ये असलेला कास्टिंग काऊचचा प्रकार हळू हळू मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. यापूर्वी याच्यावर कोण उघडपणे बोलत नसे पण आता असे काही प्रकार घडल्यास लगेच उघडकीस येतात. हि आत्ताचीच गोष्ट नाही तर बऱ्याच वर्षांपासून हे चालत आले आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला असाच एक कटू अनुभव शेयर केला आहे. अभिनयाच्या बळावर घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांनी नुकतेच एक युट्यूब चॅनल सुरु केलं आहे.

त्यांच्या दिल के करीब या कार्यक्रमामधून अनेक कलाकारांचा फिल्म इंडस्ट्रीमधील प्रवास दर्शकांना पाहायला मिळत आहे. या शो मध्ये नुकतेच अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी हजेरी लावली होती. मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने अनेक गोष्टी शेयर केल्या त्याचबरोबर सिनेइंडस्ट्रीमधील चांगल्या-वाईट अनुभवाबद्दल देखील सांगितले.

अर्चना यांनी एक बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. पण त्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. याची त्यांना नेहमी खंत वाटत राहते. याचबरोबर त्यांनी आपल्या आयुष्यामधील एक कटू अनुभव देखील शेयर केला.

अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, एका मोठ्या हिंदी चित्रपटासाठी त्यांची निवड झाली होती. चित्रपटाचे नाव सांगितले तर त्याचे खूपच वाईट परिणाम होतील असेही त्या म्हणाल्या. या चित्रपटासाठी दोघींची निवड झाली होती. त्यामध्ये मी एक होते.

चित्रपटामध्ये काम भेटणार हे नक्कीच होते पण मला असे सांगण्यात आले कि तुमचे काम पाहिले आहे, फोटो देखील चांगले आहेत. तुम्ही चित्रपटामध्ये काम करत आहात. पण यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. तुम्हाला या चार लोकांसोबत चार दिवस राहावे लागले. त्यानंतर मी त्या चित्रपटाची ऑफर नाकारली. माझ्यासोबत जी मुलगी होती तिने हि ऑफर स्वीकारल्यामुळे तिला चित्रपटामध्ये काम मिळाले आज ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Leave a Comment