साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे अनुष्का शेट्टी, एका चित्रपटासाठी घेते तब्बल इतके मानधन…

By Viraltm Team

Published on:

तेलगु चित्रपटामधील फीमेल सुपरस्टार अनुष्का शेट्टी जवळ जवळ दोन दशकांच्या मेहनतीच्या बळावर सुपरस्टार झाली आहे. पीरियड ड्रामा पासून ते सस्पेंस थ्रिलर, अॅक्शन पासून ते रोमँटिक कॉमेडी अनुष्काने आपल्या करियरमध्ये कोणतीच कसर सोडली नाही. बाहुबली १ आणि २ मध्ये आपल्या पावरफुल भूमिकेने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अनुष्का शेट्टी आता ४१ वर्षाची झाली आहे. तुम्हाला माहिती आहे का कि इतक्या वर्षांपासून चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री एक चित्रपटासाठी किती चार्ज करते, चला तर जाणून घेऊया. तिच्या कमाईबद्दल. माहितीनुसार अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी जवळ जवळ ४ ते ५ करोड रुपये चार्ज करते. माहितीनुसार अभिनेत्री अनुष्का शेट्टीजवळ २०२० पर्यंत ११०-१२० करोडची संपत्ती होती.

अनुष्का शेट्टीचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे झाला होता. अनुष्का शेट्टीने माउंट कार्मेल कॉलेज, बंगळुरू येथून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे आणि ती योग प्रशिक्षक देखील आहे. तिचा पहिला चित्रपट सुपरची शुटींग करताना दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्माता नागार्जुन शेट्टी, अनुष्कासाठी एक स्क्रीन नाव ठेवण्याचा विचार करत होते कारण त्याला वाटले कि तिचे खरे नाव दर्शक पसंद येणार नाही.

वेगवेगळ्या नावांचा विचार करताना ते अनुष्का मनचंदाला भेटले जे चित्रपटासाठी एक गाणे लिहील होती. त्यांना तिचे पहिले नाव पसंद आले आणि त्यांनी अनुष्काला फिल्मी करियरसाठी स्क्रीन नाव म्हणून वापरण्याचा विचार केला. अनुष्का शेट्टीने आपल्या करियरची सुरुवात २००५ मध्ये सुपर चित्रपटामधून केली होती आणि आता पर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या करियरमध्ये अनेक बेस्ट चित्रपट केले, जसे विक्रमारकुडु, अरुंधति, बिल्ला, वेदम, मिर्ची, बाहुबली १ आणि २, रुद्रमादेवी, साइज जीरो, भागमती.

Leave a Comment