मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करणारा अभिनेता पराग बेडेकरचे ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. अभिनेता ४७ वर्षाचा होता. त्याच्या पाठीमागे त्याची आई, पत्नी असा परिवार आहे.
यदाकदाचित, नथुराम गोडसे यांसारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. आभाळमाया या सिरीयलमध्ये देखील त्याने उत्कृष्ट काम केले होते. अभिनेता पराग बेडेकर गेल्या ३० वर्षांपासून चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत होता.
पाच वर्षांपूर्वी त्याला पोटाचा विकार झाला होत्या ज्यामुळे त्याला जठराचे ऑपरेशन करावे लागले होते. ऑपरेशन झाल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्यावर बंधने आली होती. त्यामुळे तो नेहमी अशक्त असायचा. अशक्तपणामुळे त्याला फारसे काम करणे देखील झेपत नव्हते.
१३ डिसेंबरला त्याला रात्री साडेआठ वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचे निधन झाले. १४ तारखेला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुप्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले दुख व्यक्त करत त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. उत्कृष्ट अभिनेता पराग सहज अभिनय करत असे, त्याच्या वागण्याबोलण्यात खास लकबी होत्या, बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची स्टाईल होती त्यावरून मी त्याला चिडवले कि तो हसायचा. त्याचे हास्य देखील छान होते. आता तो कुठे गेला याचा शोध थांबला आहे.