रणबीरनंतर आता ‘हा’ दिग्गज अभिनेता होणार बाबा, पहिल्या पत्नीसोबत १२ वर्षेच टिकले होते नाते, ४९ व्या वर्षी केले होते दुसरे लग्न…

By Viraltm Team

Published on:

मनोज तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभ्नेता आहे. यासोबतच तो एक स्ट्रॉन्ग पॉलीटिशियन म्हणून देखील ओळखला जातो. बीजेपी दिल्ली प्रदेश अध्यक्षची जबाबदारी सांभाळण्यापासून ते संसद पर्यंत रियल लाईफमध्ये देखील त्याने अनेक भूमिका केल्या. पण सध्या तो आपल्या राजकीय आणि फिल्मी करियरमुले नाही तर आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता मनोज तिवारीच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अशी बातमी समोर आली आहे कि तो तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे ते देखील ५१ व्या वयामध्ये. हेच कारण आहे लोक त्याच्या वैवाहिक आयुष्यामध्ये जास्त रुची दाखवत आहेत.

मनोज तिवारीने दोनवेळा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न राणीसोबत १९९९ मध्ये झाले होते. या लग्नापासून त्याला एक मुलगी झाली जिचे नाव दोघांनी रहिति ठेवले होते, पण काही वर्षांनंतर हे नाते तुटले. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि २०१२ मध्ये दोघे कायमचे वेगळे झाले.

असे म्हंटले जाते कि मनोज तिवारीने राणीला घटस्फोट दिल्यानंतर पुन्हा प्रेम झाले होते आणि शेवटी ४९ व्या वर्षी त्याने दुसरे लग्न केले. या लग्नाला त्यांनी अनेक दिवस गुपित ठेवले होत. याबद्दल कोणालाच माहिती नव्हते. पण २०२० मध्ये त्याच्या मुलीचा जन्म झाला ज्यानंतर लोकांना याबद्दल माहिती झाले होते. आता तो पुन्हा एकदा बाबा बनणार आहे आणि यामुळेच तो सध्या खूप चर्चेमध्ये आला आहे. सध्या अनेक वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे आणि राजकारणात सक्रिय दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Tiwari (@manojtiwari.mp)

Leave a Comment