साऊथ सिनेसृष्टी हादरली ! ‘या’ अभिनेत्यावर कोसळला दुखाचा डोंगर, आधी भावाचे निधन झाले आणि आता आईचे निधन…

By Viraltm Team

Published on:

साउथ सुपरस्टार महेश बाबूची आई इंदिरा देवीचे आज सकाळी निधन झाले आहे. माहितीनुसार गेल्या काही आठवड्यांपासून अभिनेत्याच्या आईची प्रकृती ठीक नव्हती. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादच्या एआईजी रुग्णालयामध्ये महेश बाबूच्या आईवर उपचार सुरु होते. प्रकृती जास्त बिघडल्यामुळे अभिनेत्याच्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. २८ सप्टेंबर रोजी सकळी अभिनेत्याच्या आईने शेवटचा श्वास घेतला.

महेश बाबूची आई इंदिरा देवीच्य निधनाची दुखद बातमी सतीश रेड्डीने आपल्या ट्विटर हँडलवर वरून शेयर केली आहे. महेश बाबूच्या आईच्या निधनाची बातमी देताना सतीश रेड्डीने लिहिले, सुपरस्टार महेश बाबूची आई इंदिरा देवीचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

अभिनेत्याची आई गेल्या काही काळापासून वयोमानाशी संबंधित आरोग्य समस्यांशी झुंज देत होती, त्यानंतर त्याचे बुधवारी पहाटे ४ वाजता त्यांचे निधन झाले. महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पद्मालय स्टुडिओमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल, त्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महेश बाबूच्या आईच्या निधनावर चाहते देखील शोक व्यक्त करत आहेत. माहितीनुसार जेव्हा इंदिरा देवी रुग्णालयात भरती होत्या तेव्हा साउथ स्टार महेश बाबू हैदराबादच्या एआईजी रुग्णालयात त्यांना रोज भेटण्यासाठी येत असे. महेश बाबूची आई इंदिरा देवीसोबत खूपच खास जवळीक होती. त्यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारू विजया निर्मलासोबत दुसरे लग्न केले होते. इंदिरा देवी आपले पती कृष्णा गारूपासून वेगळे झाल्यानंतर एकटी राहत होती, पण महेश बाबू आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांना नेहमी भेटायला जास्त असत.

महेश बाबू नेहमी त्याची आई इंदिरा देवीच्या जवळ होते. कृष्ण गारू आणि इंदिरा देवी घरामध्ये जन्मलेला महेश बाबू आपल्या घरामध्ये चौथे अपत्य होते. याच वर्षी महेश बाबूचे भाऊ रमेश बाबूचे देखील प्रकृती खराब असल्यामुळे निधन झाले आहे.

Leave a Comment