काल समृद्धी महामार्गावर अपघात, आज पुलाखाली ट्रकच अडकला, वाहनचालकाला करावी लागली अशी कसरत…

By Viraltm Team

Published on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ११ डिसेंबर रोजी नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. पण लोकार्पण करून चोवीस तास देखील उलटले नाहीत तोच वायफळ टोल नाक्याजवळ पहिल्या अपघाताची नोंद झाली. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली माल वाहतूक ट्रक अडकल्याची घटना घडली.

समृद्धी महामार्गावर महत्वाच्या रस्त्यांवर पूल बांधण्यात आले आहेत. मात्र या पुलाची उंची कमी असल्यामुळे माल वाहतूक करणारे ट्रक अडकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान काल कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली ट्रक अडकल्याची घटना समोर आली.

ट्रक बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. चेन्निया येथून धुळे कडे जाणारा ट्रक महामार्गाच्या पुलाखाली अडकला. ट्रकवर अवजड मशीन असल्यामुळे ट्रक पुलाखाली अडकला. शेवटी पोकलेंडच्या सहाय्याने ट्रकच्या खाली खड्डा करून ट्रक बाहेर काढण्यात आला.

जेव्हा समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते तेव्हा नगर-मनमाड महामार्गावरून समृद्धीचे दोन वेगवेगळे पूल बांधण्यात आले. पण पुलाची उंची खूपच कमी असल्याने ट्रक पुलाखाली अडकत असल्याचे समोर येत आहे. अखेर रस्ता खाली करून ट्रक बाहेर काढावा लागला.

११ डिसेंबर रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी महामार्गावरून प्रवास करण्याचा आनंद वाहनचालकांनी घेतला. पण यादरम्यान महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद देखल झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही.

Leave a Comment