जुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या अतुलला मिळाला मोठा दिलासा, न्यायालयाने पोलिसांना सांगितला कायदा…

By Viraltm Team

Published on:

गेल्या आठवड्यामध्ये जुळ्या बहिणींसोबत एका तरुणाने लग्न केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. या लग्नाची खूपच चर्चा झाली. सोलापूरच्या अतुल अवताडेने एकाच मांडवामध्ये दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न केले होते. या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले.

फक्त राज्यामध्येच नाही तर देशामध्ये देखील या लग्नाची मोठी चर्चा झाली. अनेक माध्यमांनी या लग्नाची दाखल घेतल्याची पाहायला मिळाली. त्यानंतर जुळ्या बहिणींसोबत लग्न केल्यामुळे अतुल चांगलाच अडचणीत सापडला. अतुल विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली.

त्यानंतर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले. पण न्यायालाने आता या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी देऊन अतुलला मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची कोर्टाने परवानगी नाकारली आहे. जुळ्या बहिणींसोबत लग्न केल्यामुळे अतुलवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण कलम १९८ चा हवाल देऊन न्यायाधीशांनी या खटल्याची चौकशी नाकारली आहे. या प्रकरणामध्ये पिडीत हा संबंधी कुटुंबामधील सदस्य असावा, पण तक्रार करणारा तिसराच व्यक्ती आहे त्यामुळे याची दाखल घेतली जाणार नाही.मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र

राहण्याची सवय लागल्यामुळे दोघींनी एकच जोडीदार निवडला. त्यांनी अतुल अवताडेसोबत एकाच मांडवामध्ये अकलूज येथे लग्न केले. मात्र लाग्नाह्य दुसऱ्या दिवशी अतुलच्या आनंदावर विरजण पडले. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४९४ नुसार त्याच्या गुन्हा दाखल केला.

पण नायालयाने हि तक्रार वैध नसल्याचे सांगत अतुलने लग्न केलेल्या २ मुलींची कोणतीच तक्रार नसल्याचे सांगत त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अतुलला आता मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment