छोट्या पडद्यावरून करियरची सुरुवात करणारे ८ कलाकार, जे आज आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज स्टार्स, ६ वे आणि ७ वे नाव जाणून व्हाल थक्क…

By Viraltm Team

Published on:

आजकाल कलाकारांसाठी टीव्हीवरून आपल्या करियरची सुरुवात करणे सामान्य बाब झाली आहे. अनेक टीव्ही कलाकार असे आहेत ज्यांनी टीव्हीनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली जागा बनवली आहे. तथापि प्रत्येक टीव्ही स्टार सिल्वर स्क्रीनवर आपली जागा बनवू शकत नाही. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करियरची सुरुवात टीव्हीवरून केली होती.

नयनतारा: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सर्वात अधिक फीस घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तथापि कदाचित खूपच कमी लोकांना हे माहिती आहे कि नयनताराने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही होस्ट म्हणून केली होती. तिने छोट्या पडद्यावर चमायाम शोमधून डेब्यू केला होता. २००२ मध्ये या शोदरम्यान तिया तिचा डेब्यू चित्रपट मनसिनक्कारे साठी ती सिलेक्ट झाली होती.

विजय सेतुपति: अभिनेता विजय सेतुपति देखील सुपरस्टार बनण्यापूर्वी पेन नावाच्या टीव्ही शोमध्ये पाहायला मिळत होता. हि सिरीयल २००६ मध्ये सन टीव्हीवर प्रसारित केली जात होती. याशिवाय तो नालया इयाकुनारो या टीव्ही शोचा देखील भाग राहिला आहे जो कालिंगर टीव्हीवर येत होता. त्याला आज विक्रम वेधा, सुपर डीलक्स, पिज़्ज़ा, मास्टर सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते.

साई पल्लवी: अभिनेत्री साई पल्लवी देखील एक अशी अभिनेत्री आहे जिने बिग स्क्रीनचा आपला मार्ग टीव्हीद्वारे बनवला. उगेल यार अदुथा प्रभु देवा या नावाच्या रियालिटी शोचा ती स्पर्धक बनली होती. सध्या तिने अनेक सुपरहिट तेलगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करून दर्शकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे.

सिवाकार्तिकेयन: टीव्हीवरून मोठ्या पडद्यावर उडी घेणाऱ्या सर्वात लोकप्रिय उदाहरणांपैकी एक नाव सिवाकार्तिकेयनचे देखील आहे. त्याने आपल्या करियरची सुरुवात एक स्टँड अप कॉमेडियन म्हणून टीव्हीवरूनच केली होती. स्टार विजय चॅनलवरील एका रियालिटी शोमध्ये तो दिसला होता. २०१२ मध्ये त्याने धनुषच्या ३ चित्रपटामध्ये सपोर्टिंग रोल केला होता. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले यामध्ये वेलइकरन, रेमो, काकी सत्तई सारखे चित्रपट सामील आहेत.

आर. माधवन: आर. माधवन भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. तो साऊथ चित्रपटांसोबत बॉलीवूडमध्ये तितकाच फेमस आहे. नुकतेच आलेल्या त्याच्या रॉकेट्री: द नांबी इफ़ेक्ट या चित्रपटासाठी त्याचे खूप कौतुक होताना पाहायला मिळत आहे. तथापि त्याने आपल्या करियरची सुरुवात सी हॉक, बनेगी अपनी बात आणि घर जमाई सारख्या सिरियल्समधून सुरु केली होती.

यश: KGF सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून जगभरामध्ये फेमस होणाऱ्या यशने नंदा गोकुला सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. हा शो ETV कन्नड़वर प्रसारित होत होता. त्यानंतर त्याने मालेबिल्लु मुक्ता आणि प्रीति इल्लादा मेले सारख्या सिरियल्समध्ये देखील काम केले आहे.

प्रकाश राज: तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यापूर्वी प्रकाश राज दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या बिसिलु कुदुरे आणि गुदड़ा भूत सारख्या सिरीयलमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्याने वांटेड, सिंघम, दबंग सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. प्रकाश राजला चित्रपटांमधील खलनायकांच्या भूमिकांसाठी ओळखले जाते.

हंसिका मोटवानी: हंसिका मोटवानी साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवण्याअगोदर तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. शाका लाका बूम बूम या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये तिने काम केले होते. त्यानंतर ती देश में निकला होगा चांद या टीव्ही शोमध्ये देखील काम करताना पाहायला मिळाली होती.

Leave a Comment