५० वर्षांपूर्वी अवघ्या ‘इतक्या’ रुपयांना मिळत होती सायकल, आता त्यामध्ये साधे पंक्चर देखील निघत नाही…

By Viraltm Team

Published on:

जरा विचार करा कि ५० वर्षांपूर्वी बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तूंची किंमत काय असेल? जेव्हा देखील आपण आजोबा किंवा पंजोबांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला हे समजते कि आधी फक्त १० रुपयांना १० ग्राम सोने मिळायचे. खाद्यपदार्थ १ किंवा २ पैशाना मिळायचे. काळानुसार महागाई देखील वाढत गेली. आज वस्तूंच्या किंमती खूपच वाढल्या आहेत.

आज सोने ५० हजार रुपये प्रती १० ग्राम मिळते. तर अनेक अशा वस्तू आहेत ज्या १०० ते २०० रुपयांना मिळत आहेत. आता सोशल मिडियावर असेच एक बिल खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि त्या काळामध्ये अवघ्या १८ रुपयांना नवीन सायकल मिळत होती. एका व्यक्तीने याचे बिल सोशल मिडियावर शेयर केले आहे.

हे बिल संजय खरे नावाच्या एका फेसबुक युजरने शेयर केला आहे. त्यांनी दावा केला आहे कि हे बिल त्यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या सायकलचे आहे. त्यांनी हे बिल शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, एकेकाळी हि सायकल माझ्या आजोबांचे स्वप्न राहिले असेल.

सायकलच्या चाकासारखे आता जग देखील किती फिरले आहे. या फोटोवर सध्या सोशल मिडिया युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहे. असो त्यावेळी सायकलची किंमत फक्त इतकीच होती. त्याप्रमाणे उत्पन्न देखील तसेच होते.

या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि इतकी स्वस्त सायकल कधी काळी असायची. तर एका दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले आहे कि खरंच देश किती बदलला आहे. आताच्या काळामध्ये तर १८ रुपयाला एक सीट देखील मिळत नाही, सायकलची खूप लांबची गोष्ट आहे.

Leave a Comment