हे आहेत भारतातील ५ मोठया कर्जदार व्यक्ती, नंबर १ ला आहेत हे महान व्यक्ती !

By Viraltm Team

Updated on:

भारत देखील सध्या व्यापारात अधिकाधिक प्रगती करत आहे. त्यामुळे जगातील अधिक वेगवान आर्थिक उलाढाल घडणारा भारत देश आहे. भारतातील अर्थव्यवस्था ही सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था म्हणून सद्यकाळात गणली जाते. शक्तिशाली आणि मजबूत भारत तयार करण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. भारतासोबतच अनेक देशांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. अनेक भारतीय व्यापार करणारे आज करोडपती झाले आहेत. पण त्याचबरोबर करोडो रुपयांचे कर्ज असलेले मोठे कर्जदार देखील आहेत. तर जाणून घेऊयात कोण आहेत हे भारतातील सर्वात मोठे 5 कर्जदार.5) सज्जन जिंदल :- सज्जन जिंदल हे भारतीय उद्योजक आहेत. जेएसडब्ल्यू समुहाचे स्टील, खाणकाम, ऊर्जा, खेळ, पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर व्यवसाय इत्यादी विविध उत्पादन असलेल्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. जेएसडब्ल्यू स्टील हे भारतातील सर्वात मोठे खाजगी स्टील उत्पादक आहेत. जेएसडब्ल्यू स्टीलने जगातील सहाव्या क्रमांकाचे आणि जपानच्या दुसर्‍या क्रमांकाचे स्टील उत्पादक जेएफई स्टीलशी मोक्याचा करार केला आहे. जेएसडब्ल्यू ग्रुप हा बहू व्यावसायिक समूह आहे. 717 अब्ज इतकी उलाढाल या कंपनीची आहे. जेएसडब्ल्यू कंपनीवर जवळ जवळ 58000 रुपयांचं कर्ज आहे. सज्जन जिंदल हे पाचव्या क्रमांकाचे भारतातील मोठे कर्जदार आहेत.4) गौतम अडानी :- गौतम अडानी हे देखील भारतीय उद्योजक आहेत. अडानी या समूहाचे ते व्यवस्थापकिय संचालक आहेत. कोळसा व्यापार, कोळसा खाण, तेल आणि वायू उत्खनन, बंदरे, बहु-मॉडेल लॉजिस्टिक, वीज निर्मिती आणि प्रसारण आणि गॅस वितरण यासारख्या व्यवसायांना हाताळण्यासाठी अदानी समूह ही जागतिक दर्जाची एकात्मिक पायाभूत सुविधा आहे.या कंपनीवर जेमतेम 72000 करोड इतके कर्ज आहे. गौतम अडानी हे चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक कर्जदार आहेत.3) जेपी गौड़ :- जेपी गौड़ एक भारतीय उद्योजक आहेत. त्यांनी जेपी समूहाची स्थापना केली. जेपी समूहाचे ते चेअरमन होते. अभियांत्रिकी व बांधकाम, विद्युत, सिमेंट, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, एक्सप्रेसवे, आयटी, खेळ व शिक्षण या व्यवसायातील हितसंबंधांसह विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवते. 855 दशलक्ष इतकी त्यांचा कंपनीची आर्थिक उलाढाल आहे. जेपी समूह हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाची अग्रगण्य सिमेंट उत्पादन करणारी कंपनी आहे. जेपी गौड़ यांचावर 85000 करोड इतके कर्ज त्यांच्यावर आहे. जेपी गौड़ हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक कर्जदार आहेत.2) अनिल अग्रवाल :- अनिल अग्रवाल हे ही एक भारतीय उद्योगपती आहेत. वेदांता ग्रुपचे ते मालक आहेत. वेदांता रिसोर्सेस लिमिटेड ही जागतिक स्तरावरील वैविध्यपूर्ण धातू व खाण कंपनी असून त्याचे मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम येथे आहे. ही भारतातील सर्वात मोठी खाणकाम आणि नॉन-फेरस मेटल कंपनी आहे. ऑस्ट्रेलिया, झांबियामध्ये त्यांचा खाणी आणि तीन देशांत तेल आणि गॅसचे कामकाज आहे. जस्त, शिसे, चांदी, तेल आणि गॅस, लोह धातू, स्टील, ॲल्युमिनियम आणि उर्जा ही त्याची मुख्य उत्पादने आहेत. या कंपनीवर जवळजवळ 90,000 करोड रुपये कर्ज आहे. डॉलर्समध्ये देखील त्यांच्यावर कर्ज आहे. अनिल अग्रवाल हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक कर्जदार आहेत.1) अनिल अंबानी :- अनिल अंबानी हे भारतातील उद्योजक आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे अनिल अंबानी हे लहान भाऊ आहेत. अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप किंवा रिलायन्स ग्रुप ह्या कंपनीचे अनिल अंबानी मालक आहेत. रिलायन्स ग्रुपच्या सहा सूचीबद्ध कंपन्या आहेत. रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि रिलायन्स हेल्थ. हा गट आर्थिक सेवा, बांधकाम, करमणूक, ऊर्जा, आरोग्य सेवा, उत्पादन, संरक्षण, विमानचालन आणि वाहतूक सेवा प्रदान करतो. सूत्रांचा माहितीनुसार या कंपनीवर सर्वात जास्त म्हणजे 113000 करोड इतके कर्ज आहे. त्यामुळे अनिल अंबानी हे भारतातील सर्वात मोठे व पहिल्या क्रमांकाचे कर्जदार आहेत.

Leave a Comment