पुरुष असो किंवा माहित प्रत्येक व्यक्तीसाठी हि जाणीव खूप खास असते कि कोणी त्याच्यावर खूप प्रेम करतो. तथापि काळ आणि वयानुसार प्रेम आणि भावनांमध्ये काही बदल येतात. तारुण्यात व्यक्ती प्रेमामध्ये रोमांचक आणि उत्तेजित होण्याची अपेक्षा ठेवतो तर वय वाढल्यानंतर त्याच प्रेमाला स्थिर आणि परिपक्व होण्याची अपेक्षा ठेवतो. पण आज आपण पुरुषांबद्दल नाही तर महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या वयाच्या चाळीशीमध्ये आपल्या पार्टनरकडून कोणत्या अपेक्षा ठेवतात.
ईमानदारी: महिला कोणत्याही वयाची असो जर ती रिलेशनशिपमध्ये असेल तर सर्वात पहिला ती आपल्या पार्टनरकडून ईमानदारीची अपेक्षा करते. तथापि मॅच्योर महिला अधिकच महत्व देते कारण तिच्याजवळ वेळ वाया घालवण्यासाठी वेळ नसतो. पुरुषांनी तिच्याशी नेहमी भावनिकदृष्ट्या प्रामाणिक राहावे अशी तिची इच्छा असते.
तुलना आवडत नाही: स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात असा पुरुष हवा असतो जो त्यांना जसा आहे तसा स्वीकारू इच्छितो. या वयातील महिलांना त्यांच्यापेक्षा लहान मुलींशी तुलना करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणारे पुरुष आवडत नाहीत.
आई लव यू ला गांभीर्याने घ्या: एक मॅच्योर महिला आई लव यू म्हणण्याचे महत्व जाणते. जेव्हा ती एखाद्या पुरुषाला हे म्हणते कि ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा याचा अर्थ आहे कि तो पुरुष तिच्यासाठी खूपच खास आहे. हीच अपेक्षा ती आपल्या पार्टनरकडून देखील करते. जेव्हा तिचा पार्टनर या तीन शब्दांचा वापर तिच्यासाठी करतो तेव्हा त्याची फिलिंग देखील तितकीच खरी असावी. मॅच्योर महिला अशा पुरुषांसाठी आपला वेळ जरासुद्धा बरबाद करत नाहीत जे कमिन्टमेंटपासून दूर पळतात. आत्मविश्वासी महिलांना त्यांना काय हवे आहे हे माहित असते आणि ते अशा व्यक्तीशी नात्यात गुंतत नाहीत जो त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांच्या भावनांशी खेळतात.
क्वालिटी रोमांस: चाळीशीमधील महिलांसाठी क्वालिटी रोमांस खूपच महत्वपूर्ण असतो. या वयातील महिला भावनात्मकरित्या आपल्या नात्याला जास्त पसंद करतात. प्रत्येक महिलेला आपल्या पार्टनर कडून आदराची अपेक्षा असते. ज्याकडे बहुतेक पुरुष दुर्लक्ष करतात. चाळीशीमधील महिलांना आपल्या पार्टनरने त्यांची काळजी घ्यावी, त्यांचा सन्मान करावा आणि सपोर्ट करावा अशी अपेक्षा असते. या वयामध्ये महिलांसाठी हेच जास्त रोमँटिक आणि अर्थपूर्ण असते.
गोल्डन हार्ट होण्याची अपेक्षा: मॅच्योर महिला अशा पुरुषांना जास्त पसंद करतात जे त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. असे पुरुष जे जीवनामध्ये पुढे जाण्याची क्षमता ठेवतात. असे पुरुष जे यशासोबत जोडीदाराचे यश साजरे करण्यावर विश्वास ठेवतात.