टीव्ही सिरियल्स भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये पाहिल्या जातात. अनेक कलाकारांसाठी टीव्हीतून बॉलीवूडचा रस्ता मोकळा होतो. गेल्या वर्षी टीव्ही आणि बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी लग्न करून संसार थाटला आहे. पण असे देखील सेलेब्रिटी आहेत ज्यांच्या लग्नाची चाहते अजून देखील वाट पाहत आहेत.
तुम्ही अभिनेत्री तब्बू, सुश्मिता सेन, अमिषा पटेल बद्दल ऐकले असेल. ज्यांनी ४०-४५ वय झाले तरी अजून लग्न केलेले नाही. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि असे फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर टीव्ही जगतामध्ये देखील आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या ४० वयामध्ये देखील सिंगल आहेत.
साक्षी तंवर: अभिनेत्री साक्षी तंवर टीव्ही जगतामधील प्रसिद्ध चेहरा आहे. बड़े अच्छे लगते हैं सारख्या टीव्ही सिरीयलमधून घराघरामध्ये ओळख बनवणारी अभिनेत्री साक्षी तंवर चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. नुकतेच तिने माई मधून ओटीटीमध्ये डेब्यू केला आहे.
४९ वर्षीय साक्षी तंवर अजून देखील सिंगल आहे. असे नाही कि तिने लग्न केले नाही, तिला असा चांगला जोडीदार मिळाला नाही जो तिचा जीवनसाथी बनेल. आपल्या एका मुलाखतीदरम्यान तिने म्हंटले होते कि मी सिंगल आहे कारण मला असे कोणी मिळाले नाही कि ज्याच्यासोबत मी लग्न करावे. मी अनेक सफल लग्न पाहिली आहेत आणि लग्नावर माझा विश्वास देखील आहे. २०१८ मध्ये साक्षीने एका मुलीला दत्तक घेतले होते. सध्या ती तिचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे.
मेघना मलिक: न आना इस देस लाडो मधील अम्मा जी तर तुमच्या आठवणीत असेलच. अम्मा जी ची भूमिका मेघना मलिकने केली होती ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. वयाची ५० शी पूर्ण केलेली मेघना मलिक अजून देखील सिंगल आहे आणि खूप आनंदी आहे.
५० व्या वर्षी मेघना अजून मिस्टर राईटची वाट पाहत आहे. कदाचित तिला असा कोणी मिळाला नाही जो तिचा एकटेपणा दूर करू शकेल. लग्नाबद्दल मेघना म्हणते कि खरेच मी सिंगल आहे आणि त्यामध्येच खुश आहे. कधी कधी मला एकटेपणा जाणवतो, पण कामामध्ये स्वतःला व्यस्त करते. मला अभिनय खूप आवडतो. मी माझ्या मिस्टर राईटची वाट पाहत आहे.
जया भट्टाचार्य: अनेक टीव्ही सिरियल्समध्ये पॉजिटिव आणि निगेटिव दोन्ही भूमिकांमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री जया भट्टाचार्यला कोणाच्या ओळखीची गरज नाही. ४४ वयामध्ये ती रिलेशनशिपमध्ये आली होती पण नंतर तिचे ब्रेकअप झाले. जयाने मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि ब्रेकअपनंतर पुरुष दोस्त तिच्या मागे लागले होते.
कदाचित त्यांना वाटत होते कि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. जया म्हणाली कि लोकांचा माइंड सेट पाहून मी हैराण झाले होते. ते स्विकार का नाही करत कि एक महिला एकटी देखील राहू शकते. जया भट्टाचार्यने थोड़ी जमीन, थोड़ा आसमान सिरीयलमधून आपली ओळख निर्माण केली होती.
शिल्पा शिंदे: भाभी जी घर पर हैं मधील अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेचे नाव या शोमुळे खूपच विवादामध्ये राहिले. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तिचे लग्न अभिनेता रोमित राज सोबत झाले होते. पण नंतर शिल्पाने ते नाते तोडले.
तिला जाणीव झाली कि रोमित तिच्या पॅरेंट्सला महत्व देत नव्हता. तथापि नंतर रोमितने टीना कक्कडसोबत लग्न करले. तर ४४ व्या वर्षी देखील शिल्पा अजून सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे. शिल्पा शिंदेने लग्नाबदल म्हंटले होते कि तिला सिंगल राहणेच चांगले वाटते.
तथापि तिने लग्न न करण्याच्या असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिल्पाने म्हंटले होते कि मला वाटते कि लग्न मोठी गोष्ट आहे आणि मोठा निर्णय आहे. पार्टनर आणि माझे विचार मिळाले पाहिजेत. आमच्या लाइफस्टाइलला पाहता असे होणे खूप कठीण आहे.
ग्रेसी सिंह: अमानत सिरीयलमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाले अभिनेत्री ग्रेसी सिंहने लगान, मुन्ना भाई एमबीबीएस आणि गंगाजल सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये परत आली. संतोषी मां सुनाएं व्रत कथाएं या सिरीयलमध्ये ती शेवटची पाहायला मिळाली होती.
४१ वर्षीय अभिनेत्री ग्रेसी सिंहने अजून लग्न केलेले नाही. तथापि तिच्या लाईफ पार्टनरची ती अजून देखील वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि ती यावर्षी लग्न करू शकते. पण अजूनपर्यंत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. ग्रेसी सिंह एका मुलाखती दरम्यान म्हणाली होती कि तिने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा अभिनेत्रीच्या योग्य टाईमबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने म्हंटले कि कदाचित पुढच्या दोन वर्षामध्ये लग्न करण्याचा योग्य टाईम राहील.
गीता कपूर: प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूरला लोक टीव्हीवर आल्यानंतर ओळखू लागले होते. तिला गीता मां म्हणून चाहत्यांमध्ये ओळख मिळाली. गीताने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. अनेक डांस रियलिटी शो जज केलेली गीता ४९ वर्षाची झाली आहे.
गीता कपूरचे नाव सिंगल सेलेब्समध्ये घेतले जाते. १५ व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या गीता कपूरचे नाव अनेक दिग्गज कालाकारांसोबत जोडले गेले. मॉडल राजीव खिंचीसोबतच्या रिलेशनशिपबद्दलची बातमी देखील समोर आली होती. पण गीताने याबद्दल काहीच म्हंटले नाही. लग्नाबद्दल प्रश्न विचारताच गीता प्रत्येक वेळी प्रश्न टाळते.