महागाई इतकी वेगाने वाढत आहे कि वस्तूंच्या किंमती कधी किती वाढतील याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. सध्या लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी साठी देखील खूप कष्ट करावे लागत आहे. अशामध्ये सोशल मिडियावर एक जुने बिल व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सायकलचे बिल आणि गव्हाचे बिल व्हायरल झालेले तुम्ही पाहू शकता.
आता या लिस्टमध्ये आणखी एक बिल जोडले गेले आहे आणि सोशल मिडियावे सध्या हे बिल तुफान व्हायरल होता हे. हे बिल दागिन्यांच्या खरेदीचे आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या जुन्या बिलानुसार हे १९५९ चे आहे. म्हणजे हे जवळ जवळ ६४ वर्षे जुने आहे.
त्या काळामध्ये सोन्याची किंमत जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. त्या काळामध्ये एक तोळ्याची किंमत फक्त ११३ रुपये होती. इतक्यामध्ये आता एक चॉकलेट देखील येत नाही. आज एक तोळ्याची किंमत ५२ हजार पेक्षा देखील जास्त आहे. व्हायरल बिलानुसार हे बिल ३ मार्च १९५९ चे आहे.
बिल महाराष्ट्राच्या वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे आहे. बिलावर खरेदीदारचे नाव शिवलिंग आत्माराम आहे. बिलावरून हे समजते कि आत्मारामने सोने आणि चांदीचे दागिने खरेदी केले होते, ज्याची एकूण किंमत ९०९ रुपये इतकी झाली आहे.
आता हे बिल खूपच व्हायरल झाले आहे. हे बिल पाहून प्रत्येकजन हैराण झाला आहे. लोकांचे म्हणणे आहे कि चांगले दिवस तर तेच होते. काहींनी म्हंटले आहे कि त्यावेळी ११३ रुपये म्हणजे आजचे ५०००० रुपये प्रमाणे आहेत. लोक या जुन्या बिलावर अनेक कमेंट्स करत आहेत. तुमचे याबद्दल काय म्हणणे आहे हे कमेंट करून नक्की सांगा.